Xiaomi 13 Series: पुढील आठवड्यात लॉंच होऊ शकते शाओमी13 सीरीज; काय असेल खास वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

xiaomi 13 series may launch next week check leaked features and specifications

Xiaomi 13 Series: पुढील आठवड्यात लॉंच होऊ शकते शाओमी13 सीरीज; काय असेल खास वाचा

Xiaomi डिसेंबरपर्यंत नवीन स्मार्टफोन सीरीज बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नवीन सीरीजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro चा समावेश असणार आही. ही नवीन सीरीज व्हॅनिला मॉडेल म्हणजेच Xiaomi 13 ची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे.

लीक झालेल्या फोटो पाहाता ही सीरीज नवीन डिझाइन असलेल्या कॅमेरा मॉड्यूलसह असणार आहे. तसेच फोनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे हे देखील समोर आले आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि कोपरे थोडेसे कर्व्ह्ड आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे समोर आले आहे की हा फोन पांढऱ्या रंगात येईल आणि काही दिवसांनी त्याचे इतर रंगांचे पर्यायही लॉन्च केले जातील. चला तर मग त्याचे डिझाइन आणि फीचर्स जाणून घेऊया.

हेही वाचा: Vi चा 50GB फ्री डेटा अन् Sony Liv सबस्क्रिप्शनसह येणारा बेस्ट प्लॅन; जाणून घ्या किंमत

Xiaomi 13 चे डिझाईन

लीक्समधूनन असे दिसून आले आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले पॅनल आणि फोनच्या मध्यभागी पंच-होल नॉच असेल. फोनमध्ये प्रो व्हेरिएंट प्रमाणेच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे आणि डिस्प्लेचा कोपरा किंचित वक्र आहे. याशिवाय फोनच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. Xiaomi 13 मध्ये उजव्या बाजूला पॉवर बटण दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट सपोर्ट दिला आहे.

हेही वाचा: Abdul Sattar Controversy: सत्तारांच्या वादग्रस्त टीकेवर 'जय हिंद जय महाराष्ट्र' करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Xiaomi 13 हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. हाच प्रोसेसर Samsung galaxy S23 सीरीज मध्ये देखील देण्यात आला आहे. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.2 इंच आहे जो फुल एचडी + रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. दुसरीकडे, या स्मार्टफोनची जाडी सुमारे 10.3 मिमी आहे ज्यामुळे डिव्हाइस अधिक सुंदर दिसतो. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की हा फोन नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो.

टॅग्स :Technology