Xiaomi 18 Pro Max Launch: Dual 200MP Leica Camera & Silicon-Carbon Battery Technology
esakal
Xiaomi 18 Pro Series Launch: जागतिक स्मार्टफोन तंत्रज्ञानात आघाडीवर असणाऱ्या Xiaomi कंपनीने आपल्या आगामी प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीकडून Xiaomi 18 Pro आणि Xiaomi 18 Pro Max हे दोन नवे फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन 23 सप्टेंबरला चीनमध्ये अधिकृतपणे लॉंच केले जाणार आहेत.
उत्कृष्ट कॅमेरा, अतिशय शक्तिशाली प्रोसेसर आणि महाकाय बॅटरी क्षमतेमुळे या सिरीजविषयी जगभरातील टेकप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.