Xiaomi च्या स्मर्टफोन्सना देखील मिळणार अँड्रॉइड 13 अपडेट, वाचा डिटेल्स

xiaomi announce miui beta version based on android 13 for xiaomi 12 and xiaomi 12 pro smartphone
xiaomi announce miui beta version based on android 13 for xiaomi 12 and xiaomi 12 pro smartphone
Updated on

तुम्ही देखील Xiaomi स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कंपनीने आपल्या यूजर्सना एक खास भेट दिली आहे. Xiaomi ने सोमवारी घोषणा केली की ते Android 13 साठी MIUI बीटा अपडेट आणत आहे .ही बीटा व्हर्जन कंपनीच्या Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro हँडसेटसाठी उपलब्ध असणार आहे, मात्र कंपनीने घोषणा केली आहे की अपडेटच्या आधीच्या टप्प्यात, फक्त 200 वापरकर्त्यांना Android 13 आधारित MIUI बीटामध्ये एक्सेस मिळेल. कंपनीने वापरकर्त्यांना असेही सांगितले की अपडेट प्रोसेससाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. याशिवाय, अपडेटनंतर फोन गरम होऊ शकतो किंवा परफॉर्मंस इश्यूला सामोरे जावे लागू शकते.

Xiaomi ने Twitter द्वारे Android 13 वर आधारित MIUI च्या बीटा व्हर्जनच्या रोलआउटची घोषणा केली. फक्त Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro वापरकर्ते अपडेटच्या पहिल्या टप्प्यात सामील होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कंपनीने खुलासा केला आहे की अपडेटच्या पहिल्या टप्प्यात फक्त 200 वापरकर्त्यांना बीटा एक्सेस दिला जाईल.

तसेच, Xiaomi ने एका कम्युनिटी पोस्टमध्ये नमूद केले आहे की बीटा टेस्टर्सना त्यांचे स्मार्टफोन अपडेट करण्यापूर्वी महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेतला पाहिजे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अपडेट प्रक्रियेस नेहमीपेक्षा जास्त वेळ लागण्याची अपेक्षा आहे आणि अपडेटनंतर डिव्हाइसला जास्त गरम होणे आणि परफॉर्मंस इश्यू येऊ शकतात.

xiaomi announce miui beta version based on android 13 for xiaomi 12 and xiaomi 12 pro smartphone
Android 13 : पिक्सेल फोनसाठी रिलीझ, जाणून घ्या टॉप फीचर्स

बीटा अपडेटचा आकार 4GB पेक्षा जास्त

हँडसेटला MIUI बीटाशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ लागू शकतो. कंपनीच्या मते काही थर्ड-पार्टी अॅप्सना Android 13 अपडेटनंतर काम करण्यास समस्या येऊ शकते. कंपनीने सांगितले की, Xiaomi 12 अपडेटमध्ये फर्मवेअर व्हर्जन V13.0.4.0.TLCMIXM आणि Xiaomi 12 Pro अपडेटमध्ये फर्मवेअर व्हर्जन V13.0.4.0.TLBMIXM.दोन्ही MIUI बीटा अपडेटचा आकार 4GB पेक्षा जास्त आहे. मंगळवारी Vivo ने देखील भारतात त्यांच्या अँड्रॉइड 13 प्रीव्ह्यू प्रोग्रामचा भाग म्हणून अशा अँड्रॉइड 13 बीटा अपडेटची घोषणा केली आहे.

xiaomi announce miui beta version based on android 13 for xiaomi 12 and xiaomi 12 pro smartphone
Vivo V25 Pro स्मार्टफोन भारतात लाँच; प्री-बुकिंगवर मिळतेय मोठी सूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com