64MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा सर्वात हलका स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

Xiaomi 11 Youth (Vitality Edition)
Xiaomi 11 Youth (Vitality Edition)
Updated on

Xiaomi 11 Youth (Vitality Edition) स्मार्टफोन चिनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनीने Xiaomi Mi 11 Lite 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला होता आणि जून महिन्यात Xiaomi Mi 11 Lite 4G स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला होता. तसेच सप्टेंबरमध्ये, कंपनीने भारतीय बाजारपेठेत Mi 11 Lite चा एक व्हेरिएंट म्हणून Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन लॉन्च केला. आता हा स्मार्टफोन Xiaomi 11 Youth (Vitality Edition) स्मार्टफोन म्हणून चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिले आहे, ज्यामध्ये 8 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे.

किंमत किती असेल?

हा स्मार्टफोन चीनमध्ये दोन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे, Xiaomi 11 Youth Vitality Edition च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,800 रुपये) आहे. तर हा स्मार्टफोन 8GB RAM + 256GB व्हेरिएंटमध्ये देखील येतो ज्याची किंमत CNY 2,299 (अंदाजे 27,300 रुपये) आहे. 10 डिसेंबरपासून हे फोन चीनमध्ये ब्लॅक, ब्लू, पिंक आणि व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला भारतात Xiaomi 11 Lite 5G NE लाँच केला होता, जे मुळात एकसारखेच डिव्हाइस आहेत.

Xiaomi 11 Youth (Vitality Edition)
Top Tweets 2021: कोहली, मोदींची हवा, मिळाले सर्वाधिक लाईक, रिट्विट

स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम (Nano) Xiaomi 11 Youth (Vitality Edition) फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर काम करतो आणि 6.55-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले यामध्ये मिळतो जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 240Hz टच सॅम्पलिंग रेट, DCI-P3 कलर गॅमट, 800 nits ब्राइटनेस आणि 402ppi पिक्सेल डेंसिटी दिली आहे. याशिवाय, हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 8 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे, सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनची बॅटरी 4,250mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर आणि USB टाइप-सी पोर्ट दिले आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Xiaomi 11 Youth (Vitality Edition)
Airtel, Vi आणि Jio चे छोटे रिचार्ज; कमी किंमतीत मिळतो कॉलिंग-डेटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com