esakal | ब्लूटूथने नियंत्रित होणारी Yamaha FZ-X बाजारात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लूटूथने नियंत्रित होणारी Yamaha FZ-X बाजारात दाखल

ब्लूटूथने नियंत्रित होणारी Yamaha FZ-X बाजारात दाखल

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : इंडिया यामाहा मोटरने ‘द कॉल ऑफ द ब्लू’ अंतर्गत भारतीय बाजारात पहिली नियो-रेट्रो दुचाकी FZ-X नुकताच लाँच केली. ब्लू टूथने नियंत्रित होणारी ही FZ-X अधिक आरामदायी राइडिंगचा अनुभव देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आधुनिक फिचर्ससह बाजारात दाखल झालेल्या या FZ-Xची दिल्ली एक्स शोरूम किंमत १ लाख १६, ८०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (Yamaha-fz-x-launched-in-india-at-rs-117-lakh)

FZ-Xची मांडणी निओ-रेट्रो डिझाईनिंग थीमवर करण्यात आली आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी यामध्ये आधुनिक फिचर्स दिले आहेत. FZ-X मध्ये एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, १४९ सीसी, एसओएचसी २-वॉल्व्ह ब्ल्यू कोर एफआय इंजिन दिले असून, जे ७,२५० आरपीएमवर १२.४ पीएस ताकद आणि ५,५०० आरपीएम पर १३.३ एनएम टॉर्क जनरेट करते. FZ-X यामाहाच्या `वाय-कनेक्ट ॲप`द्वारे नियंत्रित होते. कम्युनिकेशन कंट्रोल युनिटद्वारे इंस्ट्रूमेंट क्लस्टरवर आपल्या मोबाईलवरील नोटिफिकेशन (कॉल, मेसेज) पाहता येऊ शकतात. तसेच मोबाईलवरच गाडीच्या मेंटनन्सशी संबंधित गोष्टी, गाडी मागील वेळी कुठे पार्क केली होती त्याचे लोकेशन, पेट्रोलची माहितीही मिळणार आहे.

हेही वाचा: एलियनवर प्रेम असल्याचा महिलेचा दावा; म्हणाली, 'माणसांपेक्षा....'

FZ-X मध्ये साइड स्टँड इंजिन कट ऑफ स्विच देण्यात आला आहे. शिवाय लोअर इंजिन प्रोटेक्टर गार्ड, सिंगल चॅनल एबीएस, १६५ मिलीमीटरचा ग्राऊंड क्लिअरन्सही मिळाला आहे. FZ-X मेटॅलिक ब्लू, मॅट कॉपर आणि मॅट ब्लॅक या तीन आकर्षक रंगात उपलब्ध असून, ती जून अखेरीपासून तिच्या विक्रीस सुरुवात होणार आहे. ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या पहिल्या २०० ग्राहकांना यामाहा 'जी-शॉक'चे घड्याळ भेट म्हणून देण्यात येणार आहे. FZ-X ही भारतीय बाजारातील यामाहाची पहिली नियो-रेट्रो प्रकारची दुचाकी ज्यामध्ये टिकाऊपणा, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि स्टाईलचे मिश्रण आहे. युवकांच्या आधुनिक स्टाईलला ध्यानात ठेवूनच FZ-Xची रचना करण्यात आल्याचे यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे चेअरमन मोतोफुमी शितारा यांनी सांगितले.

व्हेरिएंटनुसार किंमत

FZ-X (ब्लूटूथ) - १ लाख १९ हजार ८००

FZ-X (ब्लूटूथ शिवाय) - १ लाख १६ हजार ८००

संपादन : शर्वरी जोशी

loading image