Yamaha Scooter Called Back : 'यामाहा'च्या तीन लाख स्कूटर्समध्ये तांत्रिक अडचण; खराब ब्रेकमुळे परत मागवल्या गाड्या.. जाणून घ्या

Yamaha Facino Break Issue : 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 यादरम्यान बनवलेल्या गाड्यांबाबत हे निर्देश देण्यात आले आहेत.
Yamaha Scooter Called Back
Yamaha Scooter Called BackeSakal

Yamaha India Recalls Scooter : यामाहा इंडियाने आपल्या रे झेडआर एफआय हायब्रीड आणि फॅसिनो एफआय हायब्रीड या दोन 125 सीसी स्कूटर परत मागवल्या आहेत. या स्कूटरच्या सुमारे तीन लाख युनिट्समध्ये ब्रेक दुरुस्त करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 यादरम्यान बनवलेल्या गाड्यांबाबत हे निर्देश देण्यात आले आहेत.

Yamaha Ray ZR 125 FI Hybrid आणि Yamaha Facino 125 FI Hybrid या स्कूटर्सच्या ठराविक युनिट्समध्ये ब्रेक लिव्हर नीट काम करत नसल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली होती. यानंतर कंपनीने तातडीने पावलं उचलत या गाड्या परत मागवल्या आहेत. केवळ जानेवारी 2022 नंतर तयार करण्यात आलेल्या गाड्यांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

Yamaha Scooter Called Back
Ola Price Cut : ई-स्कूटर घेण्याची हीच संधी! ओलाने कमी केली आपल्या गाड्यांची किंमत; मिळणार तब्बल 25,000 रुपये सूट

कंपनीने सांगितलं, की हे ब्रेक लिव्हर ग्राहकांना मोफत उपलब्ध करून दिले जातील, तसंच ते मोफत रिप्लेस देखील करून देण्यात येणार आहेत. तुमच्या गाडीला परत नेण्याची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊ शकता. याठिकाणी आपल्या गाडीचा चेसीस नंबर एंटर करून तुम्ही हे तपासू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही जवळच्या यामाहा सेंटरवर जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची मदतही घेऊ शकता. (Yamaha Break Leaver Replacement)

आपल्या उत्पादनांची उच्च गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांसाठी यामाहा प्रतिबद्ध आहे. यामुळेच इंडिया यामाहा मोटरने हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Yamaha Scooter Called Back
Hero Mavrick 440 : हीरोने लाँच केली आतापर्यंतची सर्वात प्रीमियम बाईक; रॉयल एनफील्डला देणार टक्कर .. किती आहे किंमत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com