

Yamaha recall RayZR Fascino 125cc hybrid scooters front brake caliper issue free replacement 2024 2025.
esakal
Recall of 125cc Hybrid scooter models by Yamaha : यामाहा कंपनीने आपल्या लोकप्रिय 125cc हायब्रिड स्कूटर मॉडेल्समध्ये एक महत्त्वाची खबरदारी म्हणून मोठी रिकॉल मोहीम सुरू केली आहे. भारतातील यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने (IYM) RayZR 125 Fi हायब्रिड आणि Fascino 125 Fi हायब्रिड या दोन मॉडेल्सच्या सुमारे ३ लाख ६ हजार ६३५ स्कूटर्सना रिकॉल केले आहे. हे स्कूटर मे २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत तयार झाले आहेत.