Year Ender 2021 : 2021 मध्ये लॉंच झालेले स्वस्त लॅपटॉप; ऑनलाइन क्लास, WFH साठी आहेत बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affordable laptops launched in 2021

2021 मध्ये लॉंच झालेले स्वस्त लॅपटॉप; ऑनलाइन क्लास, WFH साठी आहेत बेस्ट

affordable laptops launched in 2021 : जर तुम्ही बजेट लॅपटॉपच्या शोधात असाल आणि कोणता लॅपटॉप घ्यायचा हे ठरवू शकत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला टॉप 5 बजेट लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत. हे लॅपटॉप घरून काम करण्यासाठी (Work From Home), वैयक्तिक वापरासाठी किंवा ऑनलाइन क्लास(Online Class) साठी परफेक्ट आहेत. तसेच या लॅपटॉपची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे. याशिवाय या लॅपटॉपमध्ये तुम्हाला अनेक बरेच फीचर्स मिळतील, चला तर मग पाहूया सविस्तर..

ASUS VivoBook 14

ASUS VivoBook 14 हा एक स्टायलिश आणि कमी वजनाचा लॅपटॉप आहे. त्याचे बॉडी ही मेटलचीअसून वजन 1.6 किलो आहे. हे 4GB DDR4 RAM आणि 1TB स्टोरेजसह AMD Athlon Silver 3050U प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. या लॅपटॉपची RAM 12 GB पर्यंत वाढवता येते

Lenovo V15

या Lenovo लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय, यात AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर, 4GB DDR4 RAM आणि 1TB स्टोरेज दिले आहे. यासह, DOS ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध असेल, यात तुम्ही Windows 10 Home वर अपग्रेड करू शकाल. या लॅपटॉपमध्ये 720 पिक्सल HD कॅमेरा देखील मिळेल. याच्या बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 5 तासांचा बॅकअप मिळेल असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा: Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

Avita Pura

या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून यात AMD Ryzen 3 प्रोसेसर, SSD स्टोरेज आणि फुल एचडी डिस्प्ले देखील आहे. यासोबत 8GB DDR4 RAM आणि 256GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये विंडोज 10 होम उपलब्ध असेल. त्याची बॅटरी लाइफ 10 तास आहे.

Dell Inspiron 3595

या Dell लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला असून याच 4GB DDR4 RAM सह AMD A9 Dual Core 9425 APU प्रोसेसर आहे जो 16GB पर्यंत वाढवता येतो. यात 1TB 5400 RPM हार्ड ड्राइव्ह असून हे Windows 10 Home सह खरेदी केले जाऊ शकते.

हेही वाचा: एका चार्जवर धावतात 100 किमी; पाहा देशातील काही दमदार ई-स्कूटर्स

HP 15

HP 15 हा आणखी एक बजेट लॅपटॉप आहे. यामध्ये तुम्हाला AMD Ryzen 3 3200U प्रोसेसर सपोर्ट मिळतो. या लॅपटॉपमध्ये 4GB DDR4 रॅम आणि 1TB स्टोरेज मिळेल. लॅपटॉपची रॅम 16GB पर्यंत वाढवता येते. यात 15.6-इंचाचा HD WLED डिस्प्ले असून यामध्ये विंडोज 10 होम देखील उपलब्ध असेल.

हेही वाचा: Airtel vs Jio vs Vi चे नवीन प्रीपेड प्लॅन; मिळतेय 84 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी

Web Title: Year End Special Affordable Laptop Launched In 2021 Hp Dell Lenovo For Check Specifications Price

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top