Instagram reels : सुट्ट्यांमध्ये बनवा भन्नाट इन्स्टा रिल्स! मात्र आधी 'या' गोष्टी माहिती हव्या.. जाणून घ्या

सध्या तरूणाई सोबतच थोरामोठ्यांमध्ये देखील ट्रेंडिंग असणार्या रिल्स बद्दल काही महत्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल...
Instagram reels
Instagram reelseSakal

- प्रा. ज्ञानेश्वर गिरी

आजकाल तरूणाईमध्ये रिल्स ची खूप क्रेझ दिसून येते. गृहीणी, नोकरदार महिला इतकेच काय पण अनेक ज्येष्ठ नागरिक देखील रिल्स बनवण्यामध्ये आघाडीवर आहेत. मनोरंजन, कॉमेडी व्हिडिओ, स्पर्धा परीक्षेच्या टीप्स, दैनंदिन घडामोडी,आरोग्य, काही प्रबोधनकारांच्या कीर्तन, भारुड यांच्यावर आधारित रिल्स असे असंख्य विषय रिल्स च्या माध्यमातून हाताळले जातात.

रिल्स पाहणार्यांची संख्या जसजशी वाढते तसे तो एक उत्पन्नाचा मार्ग म्हणूनही समोर येतो आहे. शिवाय चांगला संदेश देणार्या समाजोपयोगी विषय हाताळणार्या रिल्स ला स्पॉन्सरशिप देखील मिळते. मात्र रिल्स हा उत्पन्नाचा एक मार्ग होण्यासाठी काही नियम पाळावे लागतात.

रिल्स बनवतांना या गोष्टी करा

 • रिल्स बनवण्यासाठी सोशल मीडियाचे साधन निवडा. उदा.फेसबुक, इन्स्टाग्राम, इ.

 • तुमच्या अकाउंटला बिजनेस किंवा क्रिएटर अकाउंटमधे बदला.

 • रिल्स नेमकं कोणत्या विषयावर बनवायचे आहे ते पक्के ठरवा.

 • रिल्स ला कोणते गाणे किंवा डायलॉग सेट करायचे ते ठरवा.

 • रिल्स ला बॅकराऊंड इफेक्ट कोणता द्यायचा ते निश्चित करा.

 • रिल्स साठी स्टिकर्स, इमोजी किंवा अजून वेगळे काही संदेश निवडा.

 • याशिवाय रिल्स ला तुम्ही संदेश, विचार, सुविचार मजकूर टाईप करू शकता.

 • तयार झालेल्या रिल मध्ये काही बदल करायचा असल्यास एडिट चा ऑप्शन वापरा.

 • त्यानंतर शेयर वर क्लीक करून शेयर करा. मित्र-मैत्रीणींना टॅग करायचे असेल तर तसे पर्याय निवडा.

 • रील ला कॅप्शन दया.

 • हॅश टॅगचा वापर करून नेक्स्ट वर क्लिक करा आणि रिल्स अपलोड करा.

Instagram reels
Instagram Tips : इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त

रिल्स बनवताना ही काळजी घ्या

 • समाजात वातावरण दूषित होईल अश्या रिल्स बनवू नका.

 • एखाद्या महापुरुषावर रिल्स बनवत असतांना खरी माहिती दया.

 • कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

 • पाण्याच्या ठिकाणी, टेकडीवर, झाडावर किंवा वेगवान वाहनावर रिल्स बनवू नका.

 • जीव धोक्यात घालून विद्युत तारा इत्यादी सारख्या ठिकाणी रिल्स बनवू नका.

 • लहान मुलांच्या चुकीचा परिणाम होईल अशा भाषेमध्ये रिल्स बनवू नका.

 • शैक्षणिक संस्था किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी रिल्स बनवताना अपमानकारक रिल्स बनवू नका.

 • रिल्स बनवत असताना वेळ जास्त जातो, त्यामुळे वैयक्तिक जीवनावर या रिल्स चा काही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.

 • कोणत्याही कंपनीचा लोगो वापरून रिल्स बनवू नका.

 • सोशल मीडियाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या.

Instagram reels
Instagram Reels : इन्स्टाग्राम रील्स व्हायरल जात नाहीत? फॉलो करा या सोप्या टिप्स; जाणून घ्या अपलोड करण्याची योग्य वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com