या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना बर्‍याच गोष्टी शिकवू शकता

You can teach a lot of things to children through educational apps.jpg
You can teach a lot of things to children through educational apps.jpg

पुणे : सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग बनले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईलची क्रेझ केवळ आई-वडीलच नव्हे तर मुलांमध्येही दिसून येत आहे. आजकाल अगदी दीड वर्षाची मुलंही सहज फोनवर गेम खेळताना दिसत आहेत. अशावेळी बरेचदा आई तक्रार करते की तिचा मुलगा दिवसभर फोनवरच राहतो, अभ्यासात तर त्याच लक्षच नसते. 

जर अशा प्रकारच्या आईच्या यादीत तुमचे नाव देखील समाविष्ट केले गेले असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी आता तुम्हाला थोडासा स्मार्टपणा दाखवण्याची वेळ आली आहे. जर मुले पुस्तकात लक्ष देत नसेल तर तुम्ही फोनद्वारे मुलास बर्‍याच नवीन गोष्टी सहज शिकवू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही अ‍ॅप्स डाऊनलोड करावे लागतील. तर आम्ही तुम्हाला अशाच काही शैक्षणिक अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे नक्कीच मुलासाठी उपयुक्त ठरतील. 

खान अकॅडमी

खान अकॅडमी ही एक नॉन प्रॉफिट वेबसाइट आहे. जी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी डिझाइन केलेली आहे. या अ‍ॅपवर व्याकरण, गणित, राजकारण, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र यासारख्या विषयांवर चार हजारहून अधिक व्हिडिओ आहेत. तुम्ही या साइटवरून स्ट्रीम (प्रवाहित) करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करू शकता, बुकमार्क सेट करू शकता आणि आपली स्वतःची प्रोग्रेस टेस्ट घेऊ शकता.

फोटोमाथ

जर तुमचे मुल गणितामध्ये कुठेतरी कमी असेल आणि तुम्हाला त्वरित उत्तर हवे असेल तर हे अ‍ॅप तुम्हाला यामध्ये मदत करेल. हा एक प्रकारचा कॅमेरा कॅल्क्युलेटर आहे. यात तुम्ही कोणत्याही गणिताचे समीकरण किंवा समस्या या कॅमेऱ्यावर घेऊन उत्तर मिळवू शकाल.

दुओलिंगो

तुम्ही तुमच्या मुलास अनेक भाषांमध्ये सराव (प्रॅक्टिस) करू इच्छित असाल तर हा अ‍ॅप एक चांगला पर्याय आहे. या अ‍ॅपच्या मदतीने, मुले स्पॅनिश, डच, डॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, आयरिश आणि अगदी इंग्रजी यासह अगदी सोप्या मार्गांनी बर्‍याच प्रकारच्या भाषा शिकू शकतात. हे अ‍ॅप डाउनलोड आणि वापरण्यास पूर्णपणे विनामूल्य आहे आणि अ‍ॅपमधील खरेदी पर्यायी ठेवल्या आहेत. या अ‍ॅपमध्ये दररोज थोडा वेळ घालवून तुमची मुले खेळतील आणि खेळांमध्ये जगातील बर्‍याच भाषा शिकू शकतात.

ड्रॅगनबॉक्स

काही मुले गणित विषयाला एक अतिशय कठीण विषय मानतात. परंतु जर तुम्हाला मजेदार पद्धतीने तुमच्या मुलास गणित शिकवायचे असेल तर ड्रॅगनबॉक्स तुमच्यासाठीच असेल. ही एज्युकेशनल गेम सीरीज आहे. या खेळाने 'बेस्ट लर्निंग गेम' साठी 2016 चा गेम चेंज अवॉर्ड जिंकला आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही  बीजगणित आणि भूमितीची गणिते सोडवू शकता.

स्पेलिंग स्टेज

काही मुलांना लेखन करताना स्पेलिंग लिहण्यात अडचण येते. परंतु हे असे एक अ‍ॅप आहे जे मुलांना खूप मजेदार मार्गाने स्पेलिंगची प्रॅक्टिस करून घेते. तुम्ही या अ‍ॅपची पेड सबस्क्रीप्शन घेतल्यास तुमच्या मुलाच्या वयानुसार तुम्हाला (वाइड रेंज) विस्तृत शब्द मिळू शकतात. हे अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना स्पेलिंगची आठवण करून देण्याची आवश्यकता भासणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com