

YouTube Custom Feeds: Prompt-Based AI Feeds & Redesign Launch
esakal
YouTube Update: गूगलच्या मालकीच्या जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने (YouTube) मोबाईल आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी होम पेजच्या अनुभवात आमूलाग्र बदल केले आहेत. युट्यूबने वापरकर्त्यांसाठी एआय-आधारित (AI-Based) 'कस्टम फीड्स' (Custom Feeds) हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य सादर केले आहे. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना स्वतःच्या शब्दांत किंवा प्रॉम्प्ट लिहून आवडत्या विषयांचे व्हिडिओ एकत्र पाहता येणार आहेत. यासोबतच युट्यूबने मोबाईल ॲपवरील होम टॅबचे डिझाईनही पूर्णपणे रीडिझाइन केले आहे.