यूट्यूबवर करा आता व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : व्हिडिओ निर्माते आता त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवरून लाइव्ह स्ट्रीम करू शकणार आहेत. यूट्यूबवरील दहा हजारपेक्षा अधिक फॉलोअर असलेल्या चॅनेलला मोबाईलवरून व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. 

सध्या लाइव्ह स्ट्रीमसाठी 10 हजार फॉलोअरची अट असली तरी ती आगामी काळात शिथिल करून सर्वच यूजरना लाइव्ह स्ट्रीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यूट्यूबच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर ही सुविधा सध्या मिळणार आहे. या ऍप्लिकेशनमध्येच मोबाईल लाइव्ह हा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला यूट्यूब ओपन करून कॅमेरा सुरू करावा लागेल आणि लगेचच तुमचे व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम होतील. भारतासह 20 देशांतील व्हिडिओ निर्माते लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओजच्या माध्यमातून पैसे मिळवू शकणार आहे. यासाठी कंपनीने "सुपर चॅट'हे नवे टुल आणले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YouTube now lets creators with 10,000 subscribers live-stream video on mobile