Youtube Play Something : नव्या वर्षात यूट्यूबमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; कसं वापरायचं 'Play Something'? पाहा एका क्लिकवर

Youtube Play Something Button : यूट्यूबने नवीन 'Play Something' बटण चाचणीला सुरुवात केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना योग्य व्हिडिओ शोधण्यात मदत होईल. यामुळे व्हिडिओ शोधण्याचा अनुभव आणखी सोपा होईल.
Youtube Play Something Button how to use it
Youtube Play Something Button how to use itsakal
Updated on

Yourube new feature : यूट्यूब आपल्या वापरकर्त्यांचा व्हिडिओ स्ट्रीमिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी नवे फीचर चाचणी करत आहे. 'Play Something' बटन नावाचे हे फीचर वापरकर्त्यांना योग्य व्हिडिओ शोधण्यास मदत करणार आहे. आता यूट्यूबवर स्क्रोलिंग करण्याची गरज उरणार नाही.

'Play Something' बटन कसं वापरायचं?

9to5Google च्या अहवालानुसार, हे नवीन बटन YouTube च्या खालील बारच्या वर दिसते. काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरांमध्ये हे बटन ठळकपणे दिसते. वापरकर्त्यांनी हे बटन टॅप करताच, Shorts प्लेअरमध्ये एखादा रँडम व्हिडिओ सुरु होतो. विशेष म्हणजे, हे फीचर फक्त शॉर्ट्सपुरते मर्यादित नाही; ते सामान्य व्हिडिओदेखील पोर्ट्रेट मोडमध्ये प्ले करू शकते.

व्हिडिओ बघताना युजरला लाइक, डिसलाइक, कमेंट आणि शेअर यांसारख्या पर्यायांबरोबरच व्हिडिओ स्क्रब करण्यासाठी टाइमलाइनही उपलब्ध असते. मात्र, मिनीप्लेअर अॅक्टिव्ह असताना हे बटन दिसत नाही.

Youtube Play Something Button how to use it
ISRO NVS-02 Launch : इस्रोची सेंचुरी! जानेवारीमध्ये करणार 100वे रॉकेट लाँच, समोर आली आणखी एक मोठी खुशखबर, वाचा एका क्लिकमध्ये

2023 मध्येही यूट्यूबने ‘Play Something’ फीचर चाचणी केली होती. एका Reddit युजरने 'Can’t decide what to watch?' या बॅनरसह हे बटन पाहिले होते. मात्र, त्यावेळी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते.

जवळपास 2.5 अब्ज वापरकर्त्यांचा आधार असलेल्या यूट्यूबने वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणून वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नवीन बटन स्क्रोलिंगचा त्रास कमी करत रँडम व्हिडिओ पाहण्याचा नवा अनुभव देईल.

Youtube Play Something Button how to use it
BiTV : खुशखबर! आता मोबाईल बनणार लाईव्ह TV; फोनवर बघता येणार ३०० चॅनेल तेही एकदम फ्री, या कंपनीने आणली जबरदस्त ऑफर

हे फीचर सर्व युजर्ससाठी कधीपासून उपलब्ध होईल याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. Google अद्याप या फीचरच्या अधिकृत सादरीकरणावर विचार करत आहे.

युजर्सना वाट पाहावी लागणार असली तरी, YouTube चे हे नवीन फिचर मनोरंजनाचा एक नवा मार्ग उघडणारे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com