अवघ्या 108 मिनिटांमध्ये 'या' अंतराळवीरानं पूर्ण केली होती पृथ्वीची परिक्रमा; ऐतिहासिक क्षणाला तब्बल ६० वर्षं पूर्ण  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रावर पाऊल ठेवणारा सर्वात पहिला मानव कोणता हे जर कोणी आपल्याला विचारलं तर एका क्षणाचाही विचार न करता आपण नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) हे उत्तर देऊ. मात्र अंतराळात (Space) भ्रमण करणारा पहिला अंतराळवीर कोण हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग आज जाणून

चंद्रावर पाऊल ठेवणारा सर्वात पहिला मानव कोणता हे जर कोणी आपल्याला विचारलं तर एका क्षणाचाही विचार न करता आपण नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) हे उत्तर देऊ. मात्र अंतराळात (Space) भ्रमण करणारा पहिला अंतराळवीर कोण हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग आज जाणून घेऊया या अंतराळवीराबद्दल. 

अवघ्या 108 मिनिटांमध्ये 'या' अंतराळवीरानं पूर्ण केली होती पृथ्वीची परिक्रमा; ऐतिहासिक क्षणाला तब्बल ६० वर्षं पूर्ण 

नागपूर : अंतराळ आणि अंतराळात फिरणाऱ्या कोट्यवधी ग्रहांबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण राहीलं आहे. म्हणूनच जगातील अनेक देशांच्या स्पेस एजन्सीज अंतराळातील काही अशक्य वाटणाऱ्या आणि डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टींवर संशोधन करत आहेत. मात्र हे संशोधन आज सुरु झाला नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा सर्वात पहिला मानव कोणता हे जर कोणी आपल्याला विचारलं तर एका क्षणाचाही विचार न करता आपण नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) हे उत्तर देऊ. मात्र अंतराळात (Space) भ्रमण करणारा पहिला अंतराळवीर कोण हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग आज जाणून घेऊया या अंतराळवीराबद्दल. 

युरी गॅगारिन (Yuri Gagarin) असं या अंतराळवीराचं  नाव.  9 मार्च 1934 रोजी त्यांचा जन्म रशियात (Russia) झाला. ते पायलट होते. 12 एप्रिल 1961 रोजी युरी गॅगारिन पृथ्वीच्या परिक्रमा करणारे पहिले मनुष्य ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या 'व्होस्टोक 1' (Vostok 1) नावाच्या अंतराळ यानामध्ये (Space Craft) ते अंतराळात गेले होते. व्होस्टोक 1 या अतंराळ यानानं ताशी 27,400 किलोमीटर वेगाने अंतराळातून पृथ्वीची परिक्रमा केली. हे उड्डाण तब्बल 108 मिनिटं चाललं. विशेष म्हणजे या घटनेला आज तब्बल 60 वर्ष पूर्ण झाले आहेत.

अमेरिका आणि सोव्हियत युनियन या दोन्ही देशांमध्ये संबंध फारसे चांगले नव्हते. हे दोन्हीही देश त्याकाळी अंतराळातील काही महत्वाच्या विषयांवर संशोधन करत होते. यामुळेच अंतराळावर नेमकं अधिराज्य कोणाचं? यावरून दोन्ही देशांमध्ये स्पर्धा अटीतटीची होती. अमेरिकेनं चंद्रावर पाऊल ठेवल्यामुळे सोव्हिएत युनियनलाही अंतराळ क्षेत्रात मोठी कामगिरी करून दाखवण्याची इच्छा होती. यामुळेच ही अंतराळ भ्रमणाची मोहीम आखण्यात आली.

मोहिमेची झाली सुरुवात 

यासाठी युरी गॅगारिन यांच्या अंतराळात जाण्याआधी सोव्हियत युनियननं 'व्होस्टोक 1' या अंतराळ यानाची एक प्रतिकृती बनवून अंतराळात पाठवण्याची योजना तयार केली. मानवाच्या आकाराचा एक डमी आणि एक श्वान अशा दोघांना अंतराळात पाठवण्यात आलं. हा सराव यशस्वी झाल्यानंतर महत्वाच्या मिशनसाठी एका मोठ्या टयूबचा वापर करण्यात येऊ शकतो असं सोव्हियत युनियनच्या लक्षात आलं.

'व्होस्टोक 1' झालं लाँच 

12 एप्रिल 1961 रोजी सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी 'व्होस्टोक 1' हे अंतराळयान युरी गॅगारिनसह लाँच करण्यात आलं. पुढे काय होणार याची काहीच कल्पना नसल्यामुळे या अंतराळयानात काही ऑनबोर्ड कंट्रोल देण्यात आले होते. तर इतर सर्व कंट्रोल पृथ्वीवरून करण्यात येणार होते. आपातकालीन स्थिती आल्यास युरी गॅगारिन यांना एक कोड मिळणार होता. 

घडवला इतिहास 

327 किलोमीटरच्या उंचीवर पोहोचल्यानंतर व्होस्टोक 1 या अतंराळ यानानं ताशी 27,400 किलोमीटर वेगाने अंतराळातून पृथ्वीची परिक्रमा केली. हे उड्डाण तब्बल 108 मिनिटं चाललं. असा विक्रम करणारे युरी गॅगारिन हे जगातील पहिले व्यक्ति ठरले. 

सुखरूप परतले 

अंतराळात काही आपातकालीन स्थिती उद्भवल्यास किंवा इंजिनचा अपघात झाल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण रेषेत येण्यासाठी या अंतराळयानात सुमारे दहा दिवसांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अशी वेळच आली नाही. मिशन पूर्ण करून युरी गॅगारिन हे सुखरूप पृथ्वीच्या वातावरणात परत आले. मात्र सुरक्षित लँड करण्यासाठी यानाचे सर्व इंजिन काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना सात किलोमीटरच्या उंचीवरून पॅराशूटनं लँड करण्याची गरज पडली. गॅगारिन सुखरूप परतले. 

अख्ख्या जगानं केलं कौतुक 

या जगात भारी विक्रमामुळे गॅगारिन त्याकाळी सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. मॉस्कोच्या पब्लिक प्लाझामध्ये लाखो लोकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यांचा हा विक्रम अख्ख्या जगन अक्षरशः डोक्यावर घेतला. हा पराक्रम बघून अमेरिकेलासुद्धा तोंडात बोटं घालण्याची वेळ आली होती. 

27 मार्च 1968 रोजी MiG-15 हे लढाऊ विमान चालवताना क्रॅश लँडिंगमुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र आज तब्बल 60 वर्षांनंतरही त्यांच्या कामगिरीला जग विसरलेलं नाही. त्यांच्या आठवणीत हा दिवस अजूनही साजरा केला जातो.

Web Title: Yuri Gagarin 1st Astronaut Circle Earth 108 Minutes Know About Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..