

Arattai ranking down
esakal
चेन्नईच्या झोहो कॉर्पोरेशनने जानेवारी २०२१ मध्ये शांतपणे लाँच केलेले स्वदेशी मेसेजिंग अॅप Arattai काही आठवड्यांपूर्वीच भारतीयांच्या स्मार्टफोनवर छाप पाडत होते. एंड टू एंड एन्क्रिप्शन, व्हॉइस नोट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फाइल शेअरिंगसारख्या आकर्षक फीचर्ससह हे अॅप आत्मनिर्भर भारतच्या लाटेवर स्वार होऊन गुगल प्ले स्टोअरवर टॉप फ्री कम्युनिकेशन अॅप्समध्ये अव्वल स्थानावर पोहोचले.