तुम्ही झोमॅटो वापरता? मग जरा जपून!

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

'एनक्ले' नावाच्या एका युझरने ही माहिती हॅक केल्याचा दावा केली करीत ती विकण्याची घोषणा केली आहे. या माहितीची किंमत 1,001.43 डॉलर म्हणजेच बिटकॉईनमध्ये 0.5587 एवढी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती हॅकरिड.कॉमने दिली आहे.

मुंबई - तुम्ही बाहेरून जेवण मागविण्यासाठी 'झोमॅटो'ची सेवा वापरत असाल तर कदाचित तुमचा ई-मेल आयडी आणि हॅश्ड पासवर्ड हॅकर्सच्या हातात पडू शकतो. ऑनलाईन रेस्टॉरंट सेवा देणारी कंपनी 'झोमॅटो'देखील सायबर हल्ल्याचा बळी ठरली आहे. कंपनीची सेवा वापरणाऱ्या एक कोटी 70 लाख ग्राहकांची माहिती 'हॅक' झाली आहे, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीच्या डेटाबेसमधून ग्राहकांचे ई-मेल अॅड्रेस आणि हॅश्ड पासवर्ड्स चोरण्यात आले आहेत.

परंतु काळजीचं काही कारण नाही! कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ग्राहकांचे पासवर्ड 'रिसेट' करुन वेबसाईट आणि अॅप्लिकेशनवरुन ग्राहकांना 'लॉग आऊट' केलं आहे. तसेच क्रेडिट कार्डासंबंधीची माहिती पुर्णपणे वेगळ्या आणि अधिक सुरक्षित डेटाबेसमध्ये ठेवण्यात आली आहे; यामुळे या माहितीला कोणताही धोका नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.

'एनक्ले' नावाच्या एका युझरने ही माहिती हॅक केल्याचा दावा केली करीत ती विकण्याची घोषणा केली आहे. या माहितीची किंमत 1,001.43 डॉलर म्हणजेच बिटकॉईनमध्ये 0.5587 एवढी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती हॅकरिड.कॉमने दिली आहे.

चोरी झालेले पासवर्ड 'हॅश्ड' स्वरुपातील असले तरीही हा पासवर्ड इतर ठिकाणी वापरणाऱ्या ग्राहकांना तो बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'हॅशिंग'मध्ये मूळ पासवर्ड एका कोडवर्डमध्ये रुपांतरित होतो. तो पुन्हा पहिल्या स्वरुपात येत नाही. यामुळे हॅश्ड पासवर्डचा दुरुपयोग अशक्य आहे. ही माहिती कशामुळे हॅक झाली यामागील कारणांचा शोध घेत असून माहिती आणखी सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे असे झोमॅटोने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zomato hacked: Security breach results in 17 million user data stolen