Video : सोलो ट्रॅव्हलर : थोडे घुमक्कड होऊयात...

शिल्पा परांडेकर
Friday, 14 February 2020

नाव : अंजली इंदुरख्या
वय : २९ वर्षे
काम : सॉफ्टवेअर डेव्हलपर (कैपेजेमिनी)
शहर : पुणे

‘जर तुम्हाला तुमची स्वतःची सोबत आवडत नसल्यास मला नाही वाटत की, तुम्ही इतर कोणाच्याही सोबतीचा आनंद घ्याल,’ हा मंत्र केवळ सोलो ट्रॅव्हलरसाठीच नव्हे, तर अशा अनेक सोलो गोष्टींसाठी आहे. हा खास मंत्र आणि तिच्या प्रवासाच्या गोष्टी सांगत आहे एक ‘घुमक्कड बंदी’ अर्थात फिरण्याची आणि नवीन गोष्टी पाहण्याची आवड असणारी आजची सोलो ट्रॅव्हलर ‘अंजली’.

नाव : अंजली इंदुरख्या
वय : २९ वर्षे
काम : सॉफ्टवेअर डेव्हलपर (कैपेजेमिनी)
शहर : पुणे

‘जर तुम्हाला तुमची स्वतःची सोबत आवडत नसल्यास मला नाही वाटत की, तुम्ही इतर कोणाच्याही सोबतीचा आनंद घ्याल,’ हा मंत्र केवळ सोलो ट्रॅव्हलरसाठीच नव्हे, तर अशा अनेक सोलो गोष्टींसाठी आहे. हा खास मंत्र आणि तिच्या प्रवासाच्या गोष्टी सांगत आहे एक ‘घुमक्कड बंदी’ अर्थात फिरण्याची आणि नवीन गोष्टी पाहण्याची आवड असणारी आजची सोलो ट्रॅव्हलर ‘अंजली’.

ती म्हणाली, ‘त्या वर्षी ‘दिल चाहता है’मुळं गोव्याची खूप हवा झाली होती. तीन मित्र आणि गोवा. आम्हाला तिघींना पण जायचं होतं आणि आम्ही नियोजनही केलं. परंतु, माझ्या मैत्रिणींच्या पालकांनी ऐनवेळी नकार दिला. माझं स्वप्न, गोव्याला जाण्याची तयारी या सगळ्यावर एका क्षणात पाणी पडलं.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदास होऊन, हार मानून बसतील तर ते सोलो ट्रॅव्हलर कसले? अंजलीनं गोव्याच्या या सात दिवसांमध्ये स्वच्छंदी, निर्भर, बिनधास्तपणे बिचेस, पार्टीज, नाईट लाइफ, शॉपिंग असं सर्व काही एकटीनं अनुभवलं. हा प्रवास अंजलीच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या प्रवासामुळं तिच्यात पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास दृढ झाला, ती अधिक सक्षम झाल्याचं सांगते. या प्रवासानंतर तिनं दिल्ली, दीव, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर तसेच नेपाळ हा प्रवास एकटीनं केला.

तिला एकटीनं प्रवास करण्याबरोबरच इतर सोलो ट्रॅव्हलरना मदत करणंदेखील आवडतं. ‘The More You Go, The More You Know’ अर्थात, तुम्ही जितके अधिक फिराल तितके अधिक तुम्ही प्रगल्भ व्हाल, असा तिला ठाम विश्वास आहे. याच जाणिवेतून ‘घुमक्कड बंदी’ या तिच्या यू-ट्यूब चॅनेलचा व ब्लॉगचा जन्म झाला. या माध्यमातून ती सोलो ट्रॅव्हलर्सना नवनवीन ठिकाणांची माहिती देते व टूरच्या नियोजनासाठी मदत करते. ती म्हणते, ‘मी एकटी कशी जाऊ, असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. सोलो ट्रीप करायची आहे म्हणजे कुठंतरी दूरच जायला हवे, असे नाही. तुम्ही सुरुवात तुमच्या आसपासच्या ठिकाणांपासून करू शकता. किंवा एखादा चित्रपट एकटीनं पाहायला जा. यातून तुमचा आत्मविश्वास वाढंल आणि मग तुम्ही एखाद्या मोठ्या ट्रीपसाठी तयार व्हाल.’

आताही तुम्हाला एकटी कशी जाऊ हा प्रश्न सतावतोय? या ‘घुमक्कड बंदी’नं किती सहज व सोपा मार्ग सांगितला आहे, एकटीनं प्रवास करण्याचा. चला तर मग वाट कशाची पाहता, आपणही थोडे घुम्मकड होऊयात.

आवाहन
तुमचा ‘सोलो’ प्रवासही असाच खास आहे का? आम्हाला तुमच्या सोलो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाची गोष्ट आणि अनुभव जाणून घ्यायला आवडेल. तुमचे अनुभव ३०० शब्दांत लिहून आम्हाला 
maitrin@esakal.com येथे मेल करा. निवडक अनुभवांना प्रसिद्धी दिली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on anjali indurakhya