सोलो ट्रॅव्हलर : असे दांडगी इच्छा...!

शिल्पा परांडेकर
Saturday, 4 April 2020

सोलो ट्रॅव्हल्स पेजेस

 • प्रिसिलीया - I-PRIDE – फेसबूक
 • साक्षी - २ सोलो सोल्स (फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब)
 • अंजली - घुम्मकड बंदी (इन्स्टाग्राम, यु-ट्यूब)
 • संयमी - sooyummyblog.wordpres.com5.
 • शबाना - solo_traveller_shabana (फेसबुक, इन्स्टाग्राम,यु-ट्यूब)
 • अदिती - http://goangirlzindagi.com/wp/

फ्लाईट बुकिंग - Skyscanner, MMT and Goibibo
हॉटेल बुकिंग - booking.com, Airbnb, Hostelworld.com, couchsurfing

सोलो ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून महिलांनी एकटीने, नियोजनपूर्वक व निडरतेने प्रवास करावा या हेतूने ही प्रोत्साहनपर लेखमाला सुरू झाली होती आणि आनंद आहे की, आमचा हेतू सफल झाला. या साऱ्याजणींकडून खूप शिकता आले. विशिष्ट चौकटीतून जगाकडे न पाहता विस्तारित दृष्टिकोनातून पाहण्याचा एक नवा आयाम मिळाला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागालँडच्या घनदाट जंगलात भ्रमंती करणारी ज्योती जेव्हा सांगते, ‘चांगल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवा व मनातील ‘किंतू’ला दूर करून प्रवासाचे धाडस करा.’ तेव्हा खरंच ‘त्या किंतू’ला दूर सारून आपणही एकटीने प्रवासाचे धाडस करावे, असे वाटते. परीक्षेतील अपयशानंतर सोलो प्रवासाचे आयोजन करणारी व नंतर स्वतःची ‘एज्यु-कल्चरल टुरिझम’ कंपनी सुरू करणारी नीलिमा, ‘जो काम मजा है, उसे अपना प्रोफेशन बनाओ. फिर ओ काम, काम नहीं खेल लगेगा,’ हे अक्षरशः सत्यात उतरवणारी अदिती व ‘Ikigai’ अर्थात, ‘प्रवास हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे,’ हे सांगणारी ऋचा यांच्या प्रवासातून आडवाटेचा प्रवासही आत्मविश्‍वासाने पार पाडता येतो याची खात्री पटते.

कोणीतरी कुठेतरी एकटीला सोडून जाते किंवा ठरलेला प्रवास अचानक रद्द करते आणि ‘मग आता काय,’ असा विचार करत न बसणाऱ्या अंजली, दिपाली, साक्षी या प्रवासाच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेतात आणि या क्षेत्रात काहीतरी अफलातून काम करतात, तेव्हा आपणांसही ‘मी एकटी कशी’ हा विचार बाजूला सारून मनसोक्त भटकंती करावी, असे जरूर वाटते. भारत पाहण्यासाठी सलग ३६५ दिवस प्रवास करणारी राखी व पनवेल ते कन्याकुमारी सायकलवरून एकटीने प्रवास करणारी प्रिसिलीया या त्यांच्या प्रवासाच्या माध्यमातून सामजिक बांधीलकी, राष्ट्रीय अस्मिता व पर्यावरणाचे रक्षण अशी मूल्ये शिकवून जातात. प्रवास ‘यम्मी’ही असू शकतो तसा प्रवास ‘गगनभरारी’ घेणाराही असू शकतो, हे संयमी आणि शबाना यांच्या प्रवासाच्या ओढीतून जाणवले. सरतेशेवटी विंदाच्या या चार ओळींनी या लेखमालेचा, या ट्रॅव्हल्सचा आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेते.

‘असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..’’

 • ट्रिपचे नियोजन करण्यापूर्वी विविध ब्लॉग वाचावेत.
 • प्रवासात ‘सिक्स्थ सेन्स’ जागृत ठेवा.
 • अनोळखी व्यक्तींशी अधिक बोलणे किंवा विनाकारण वाद टाळा.
 • कुटुंबाच्या संपर्कात राहा.
 • प्रवासाच्या आर्थिक नियोजनासाठी स्वतंत्र बचत खाते काढता येईल.
 • होम स्टे, स्थानिक आहार यामुळे आर्थिक बचत करता येईल तसेच प्रवासात अनेक गोष्टी पाहता येतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shilpa Parandekar on Solo Traveler