सेलिब्रिटी वीकएण्ड : ट्रेकिंग मस्टच...

अजित अरोरा
Saturday, 1 February 2020

मुंबईतील वाहतूक, गर्दी अन् धावपळीच्या जीवनातून रिलॅक्स होण्यासाठी अनेक जण असा पर्याय शोधतात. शांतता लाभेल असं ठिकाण शोधतात. त्यामुळं मी आणि आमचा ग्रुप वीकएंडला ट्रेकिंगला जातो.

मी   अभिनय क्षेत्रात असल्यामुळं लवकर सुटी मिळत नाही. सुटी मिळते त्या वेळी मी नक्की काहीतरी प्लॅन आखतो. कारण, मुंबईमधून बाहेर पडणं गरजेचं असतं. मुंबईतील वाहतूक, गर्दी अन् धावपळीच्या जीवनातून रिलॅक्स होण्यासाठी अनेक जण असा पर्याय शोधतात. शांतता लाभेल असं ठिकाण शोधतात. त्यामुळं मी आणि आमचा ग्रुप वीकएंडला ट्रेकिंगला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोणावळा, माथेरान ही आमची आवडती ठिकाणं. तिथं गेल्यावर आठवडाभर आलेला थकवा दूर होतो. अनेकदा आम्ही योगाचे सेमिनार करतो. दूर जाणं शक्य न झाल्यास सिनेमा किंवा मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातो. पण, ट्रेकिंग करून मन जसं प्रसन्न होतं, तसा अनुभव मॉलमध्ये येत नाही. मी मूळ कॅलिफॉर्नियातील आहे. पण, सिनेमानिर्मितीमुळं मुंबईत राहतोय. तिकडं तर खूपच भटकंती करतो. त्यासाठी प्लॅन तयार करतो. आवश्यकतेनुसार ज्या वस्तू पाहिजे, त्या बरोबर घेऊन बाहेर पडतो. 

निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळं मन मोकळं होतं. त्याचा फायदा मला निर्मिती क्षेत्रात होतो. ‘उनाड’ या सिनेमासाठी मला कोकणातील लोकेशन कामी आले. निसर्ग जवळून पाहिल्यास आपल्या विचारांची पातळी उंचावते. त्याचा फायदा मला ‘उनाड’ सिनेमाची निर्मिती करताना झाला. त्यामुळं प्रत्येकानं आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात जायलाच हवं. मला हिमालय, केदारनाथ इथं फिरायला आवडतं. आपण सर्व ताणतणाव विसरून जातो. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होतो. मात्र, ट्रेकिंग करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Weekend Trekking

Tags
टॉपिकस
Topic Tags: