तुम्हाला कॅम्पिंगची आवड असेल तर 'या' हॅक्स ठरतील उपयुक्त

know about some amazing camping hacks Marathi Article
know about some amazing camping hacks Marathi Article

नाशिक : कॅम्पिंगला जाणे हा कायमच एक रोमांचक अनुभव असतो. हे आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्याची  काही तास किंवा दिवस तंत्रज्ञान आणि इंटरनेटपासून दूर राहण्याची संधी यामुळे आपल्याला मिळते देते. मात्र, यशस्वी कॅम्पिंग अनुभवासाठी आपल्याला काही तयारी अगोदरच करावी लागेल.  तरीही आपल्याला कॅम्पिंग दरम्यान अनेक लहान-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काही हॅक्स माहिती असणे आवश्यक आहेत. बर्‍याच लोकांना या हॅक्सची माहिती नसते. कदाचित आपणास देखील कॅम्पिंग आवडेल आणि त्या दरम्यान आपल्याला डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यास आणि योग्यरित्या अन्न शिजवताना अडचणी येतील. आज आपण अशाच कॅम्पिंग दरम्यान उपयोगी पडतील अशा काही हॅक्स जाणून घेणार आहोत.

मॅश बॅगसोबत ठेवा

कॅम्पिंग दरम्यान मॅश बॅगमध्ये कपडे आणि ओले शूज ठेवण्याशिवाय आपण आपले जेवणाच्या प्लेट आणि भांडी इत्यादी अगदी सहज ठेवू शकता. अशाप्रकारे कॅम्पिंग दरम्यान आपले साहित्य व्यवस्थित ठेवणे आपल्यासाठी खूप सोपे होईल.

क्लॉथ पिन देखील कामी येतील

आपण कदाचित विचार केला नसेल, परंतु कॅम्पिंग दरम्यान लहान कापडे अडकवण्याची पिन  कॅम्पिंग दरम्यान खूप उपयुक्त ठरू शकते. कॅम्पिंग दरम्यान आपले कपडे वाळवत घालण्यासोबतच आपण टेबलक्लोथ दे हवेमध्ये उडू नये म्हणून त्या वापरु शकता. या व्यतिरिक्त, जर आपल्याकडे थोडे खाणे-पिणे बाकी असेल तर आपण त्याचे पॅकेट या पिन वापरुन बंद करू शकता.
 

केक कव्हर 

आपण कॅम्पिंग दरम्यान केक घेऊन नक्कीच जाणार नाही. पण केक कव्हर हे कागदाच्या प्लेट्स आणि नॅपकिन्स ठेवण्यासाठी वापरता येऊ शकते, ज्यामुळे वाऱ्याने ते उडून जाणार नाहीत. 
 

शॉवर कॅपचा वापर

आता तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला कॅम्पिंग दरम्यान शॉवर तर घ्यावा लागणार नाही तर शॉवर कॅपचा काय उपयोग? कॅम्पिंग ट्रिपमध्ये शॉवर कॅप ही एक खूप कामाची वस्तू आहे. आपण त्यांचा उपयोग खराब झालेले शूज ठेवण्यासाठी किंवा माशी आणि कीटकांपासून अन्न झाकण्यासाठी करू शकता. फक्त दोन्हीची अदलाबदल होणार नाही याची काळजी घ्या.
 

पिल ऑर्गनायजर

पिल ऑर्गनायझर निश्चितच आपल्यास कॅम्पिंग दरम्यान उपयुक्त ठरेल . आपल्या  कॅम्पिंगच्या काळात आपण त्यामध्ये आपली औषधे ठेवू शकता. तसेच स्वयंपाकासाठी लागणारे मसाले साठवण्याकरिता हे एक उत्तम ठरेल. 
 

बेल्टला बनवा भांडे होल्डर

कॅम्पिंग दरम्यान, भांडी व्यवस्थित मांडण्यायची असतील तर तुम्ही कमरेचा बेल्ट अशा प्रकारे झाडावर बांधा आणि त्यामध्ये काही आकडे अडकवून त्याचा उपयोग करु शकता. यानंतर  हे आपले भांडी  धुऊन सहज सुकण्यास मदत करेल. तसेच आपण त्यांना जमिनीवर ठेवण्याची गरज राहाणार नाही.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com