गोव्याला फिरायला जाताय? मग या धबधब्यांना नक्की भेट द्या

Know about some beautiful waterfalls in goa Marathi Article
Know about some beautiful waterfalls in goa Marathi Article
Updated on

गोव्याचे नाव घेताचा आपल्या मनात सुंदर समुद्रकिनाऱ्याचे चित्र समोर येते. पण गोव्याचे सौंदर्य फक्त इतकेच मर्यादित नाही. गोव्यला निसर्गाची सुंदर देणगी मिळाली आहे  येथे आपल्याला  नैसर्गाचे सौंदर्य सगळीकडे विखुरलेले पाहायला मिळेल. गोव्यात सुंदर समुद्रकिनार्‍याशिवाय मंदिरे आणि चर्च देखील आहेत इत्यादी आहेत ज्याना तुम्ही भेट देऊ शकता. 


याशिवाय गोव्यात बरेच धबधबे देखील आहेत, ज्याबद्दल लोकांना कमी माहिती आहे. हे धबधबे त्या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्यात कित्येक पटींनी भर घालतात. तुम्ही बर्‍याच वेळा गोव्याच्या सहलीवर जाण्याचा विचार करत असाल तर या धबधब्यांना नक्की भेटी द्या. 

हिव्रे वॉटरफॉल्स

वालपोई गोव्यातील हा एक लोकप्रिय धबधबा आहे. हिवरे धबधबा केवळ निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनाच आकर्षित करत नाहीत, तर हार्ड कोर ट्रेकर्ससाठी देखील एक चांगले ठिकाण आहे, कारण आपण येथे तुम्ही एडव्हांस ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. आठवड्याच्या शेवटी येथे खूप गर्दी असते. उन्हाळ्यात भेट देण्यासाठी गोव्यातील सर्वोत्कृष्ट धबधबा आणि एक उत्तम ठिकाण आहे. हिव्रे धबधबा जवळील इतर आकर्षणे म्हणजे नानुज किल्ला, तांबडी सुरला आणि श्री महादेव मंदिर या ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता.


तांबडी सुरला धबधबे 

उत्तर गोव्यातील हा एक मोठा धबधबा म्हणून लोकांना माहिती आहे. येथे सुंदर समुद्रकिनारा आणि नैसर्गिक सौंदर्यतेची कमतरता नाही तसेच नैसर्गीक सौंदर्य आणि मंदिराभोवती असलेले हेरिटेज वन पर्यटकांना आकर्षित करते. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून पायी प्रवास करुन आपणास तांबडी सुरला येथे जाता येते. हा गोव्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. तुम्हाला येथे भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य व आपण तामडी सुरला मंदिरात चांगला वेळ घालवता येईल. 

दूधसागर धबधबा 

मंडोवी नदीवर असलेला दूधसागर धबधबा हे भारतातील सर्वात सुंदर धबधबा आहे. गोवा-कर्नाटक सीमेवर १३० मीटर उंचीवरून खाली कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना पाण्याचा आवाज आणि सभोवतालच्या हिरव्यागार सौंदर्यासह रोमांचित करतो. येथे गेल्यास दुधसागर धबधब्याजवळ असणाऱ्या शैयाद्री स्पाइस फार्म आणि भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांना देखील नक्की भेट द्या. 


अरवलम धबधबा 

हरवेलम धबधबा म्हणून प्रसिद्ध, ही सेंचलिम गावाजवळ 50 मीटर उंचीच्या टेकडीवरुन खाली येणारी नेत्रदीपक नदी आहे. गोव्यातील अरवलम धबधबा एक सर्वाधिक लोकप्रिय धबधबा आहे आणि येथे तुम्ही निसर्गाचे सौंदर्या देखील पाहू शकतात. हे गोव्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. अरवलम धबधब्याजवळील इतर आकर्षणांविषयी सांगायचे  झाल्यास येथे अरवलम रॉक कट लेणी आणि रुद्रेश्वर मंदिर आहे. तसेच तुम्ही अ‍ॅडव्हेंचर फ्रीक असल्यास,आपण व्हाइट वॉटर राफ्टिंगचा आनंद देखील घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला 12 किलोमीटर दूर वालपोई गावात जावे लागेल. 

नेत्रावली धबधबा 

२११ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या नेत्रवलीचा धबधबा पाहाण्यात एक अनोखा आनंद आहे. पश्चिम घाट परिसराचे वन्यजीव अभयारण्य म्हणून वसलेले आणि संरक्षित, नेत्रवली धबधबे हे सर्व निसर्ग प्रेमींसाठी एक उत्तम स्थान आहेत. हा उत्तर गोव्यातला सर्वात सुंदर धबधबा आहे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. नेत्रावली वॉटरफॉलमध्ये आपण पक्षी निरीक्षणे आणि वन्यजीव पाहाणे यासारख्या गोष्टी करू शकता. त्याशिवाय नेत्रावली धबधबा जवळील इतर आकर्षणांपैकी माडी वन्यजीव अभयारण्य सर्वात प्रमुख आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com