शाही थाटात लग्न करायचंय? भारतातील हे राजवाडे सर्वोत्तम ठिकाण, जाणून घ्या वैशिष्ट्ये

know the best palace for wedding ceremony in India article
know the best palace for wedding ceremony in India article

भारत हा जगातील दुसरे सर्वात मोठे आणि महागडे वेडिंग मार्केटआहे. सध्या देशात रॉयल वेडिंगची खूप मागणी आहे. लोक आपली विवाहसोहळे शाही थाटात करण्यासाठी योग्य जागा शोधतात. भारतात अशी अनेक राजवाडे आहेत जिथे देश-विदेशातील लोक लग्न करण्यासाठी येतात. आधुनिक सोयीसुविधा असलेले हे पॅलेस शाही लग्नासाठी प्रसिध्द आहेत. चित्रपटांमध्ये या पॅलेसमधील होत असलेले लग्न बघून प्रत्येकालाच तसे लग्न कराण्याची इच्छा होते. राजवाड्याच्या आतील इंटेरियरपासून ते लोकेशनपर्यंत सगळंच अतिशय सुंदर असतं. जर तुम्हालाही  असाच शाही थाटात विवाह करायचा असेल तर आपण भारतातील या सुंदर राजवाड्यांमध्ये प्लॅन बनवू शकता. एवढेच नव्हे तर भारताची ही राजवाडे जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.

तिजारा फोर्ट पॅलेस, राजस्थान

तिजारा फोर्ट हा एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या सेटपेक्षा कमी नाहीये . हे एक परिपूर्ण हॉटेलच नाही तर रॉयल वेडिंगसाठी देखील परफेक्ट ठिकाण आहे. 4 स्टार तिजारा फोर्ट बॅनक्वेट, हॉल, मैदान, लॉन आणि रेस्टॉरंट्ससारख्या सुविधांनी परिपूर्ण आहे. संपूर्ण किल्ल्याचा लुक खूपच सुंदर आहे. किल्ल्यात बर्‍याच खोल्या आहेत ज्यात फर्निचरची खास सजवट केलेली आहे. लग्नाच्या मोसमात शहरातील मंडळी तिजारा फोर्टवर लग्न करणे पसंत करतात. लांब लॉन आणि सुंदर घुमटासह या राजवाड्यात लग्न करण्याची मजाच वेगळी आहे. 

शिव निवास पॅलेस, उदयपूर

एचआरएच हॉटेलांनी विकसित केलेला फतेह प्रकाश पॅलेस रॉयल वेडिंगसाठी एक अनोखा ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्यासाठी आणि आपल्या अतिथींसाठी सर्वात रॉयल लग्न आयोजित केले जाऊ शकते. इतकेच नाही तर या हॉटेलात अनेक सेलिब्रिटींचे लग्न देखील झाले आहे, ज्यामुळे या ठिकाणाला बरीच पसंती मिळते. अतिथींना हाताळण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची यांची पध्दत आकर्षक आहे. आपल्या स्वप्नातील लग्नासाठी हे परफेक्ट ठिकाण असू शकते.

सामोद पॅलेस, जयपूर

जयपूरमधील समोद पॅलेस लग्नाच्या मेजवानीसाठी एक सुंदर हॉटेल आहे. सामोद पॅलेस मोगल शैली तसेच राजपूत स्टाईलमध्ये बांधलेला आहे. याखेरीज येथे विविध प्रकारच्या कला व चित्रांचे घर आहे, जे लग्नात बर्‍याच लोकांना आकर्षित करते. साइट प्रभावी आहे तसेच त्याच्या नैसर्गिक सौंदर्या  अनुभवता येते. आपण येथे कोणतेही मोठे लग्न सहजपणे आयोजित करू शकता. येथे अतिथींच्या निवडीनुसार पदार्थ बनवले जातात. हे पूर्णपणे एक लक्झरी हॉटेल आहे, जे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

ताज रामबाग पॅलेस, जयपूर

जयपूरच्या लोकप्रिय आणि भव्य राजवाड्यांपैकी एक म्हणजे ताज रामबाग पॅलेस. हा राजवाडा विमानतळापासून 8 कि.मी. अंतरावर आहे. याच्या जवळपास जयगड, कैसरबाग लॉन, मुबारक महल, रामगड यासारख्या अंतर्गत आणि बाह्य विवाहाची जागा उपलब्ध आहेत. या ठिकाणी 100 ते 1800 पर्यंत पाहुणे होस्ट करू शकता. आपल्या गरजेनुसार संपूर्ण सोहळा पर्सनलाईज करण्यासाठी इन-हाउस केटरर्सची सर्वोत्तम टीम येथे देण्यात येते. इतर भव्य वाड्यांप्रमाणेच हे ठिकाणसुद्धा आधुनिक सुविधांनी युक्त आहे.

लीला पॅलेस उदयपूर

लीला पॅलेस उदयपूर पिचोला तलावाच्या काठावर आहे. आणि या ठिकाणाहून अरवल्ली पर्वतांचे एक नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळेत.  लीला पॅलेस उदयपूर मधील खोल्या आणि अंतर्गत जागा राजस्थान डिझाइन आणि कलात्मकतेच्या पारंपारिक घटकांनी सुशोभित केलेली आहेत. आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या राजवाड्याचे आतील व बाहेरील सौंदर्य आपले हृदय जिंकण्यासाठी पुरेसे आहेत. जर एखाद्या परिकथेतील लग्नसोहळ्याप्रमाणे लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर हे ठिकाण परफेक्ट डेस्टीनेशन आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com