
आज महाशिवरात्री... कैलास पर्वंत आणि शंकराचं नातं अविभाज्य आहे. कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असं स्थळ आहे जे तिबेटच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचं निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वतावर आजतागायत कुणीही चढाई करु शकलेले नाहीये. त्यामुळे या पर्वताकडे एखाद्या रहस्याप्रमाणेच पाहिलं जातं. काय आहेत यामागची कारणे? कुणीच गिर्यारोहक आजतागायत इथे चढाई का बरे करु शकला नाहीये, याचीच माहिती आपण आज घेणार आहोत...
कैलाश या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. चारी बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. या पर्वताची उंची 6638 मीटर इतकी आहे. या पर्वतावर सिंधू, ब्रम्हपुत्रा आणि सतलज अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात. कैलाश पर्वताची ही उंची जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टपेक्षा तब्बल 2200 मीटरनी कमीच आहे. मात्र, या पर्वताचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की, या पर्वतावर आतापर्यंत कुणीही यशस्वी चढाई करु शकलेले नाहीये. हिंदू आणि बौद्ध धर्मियांची या पर्वतावर आपार श्रद्धा आहे. पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. एखाद्या प्रसिद्ध शिखरावर न झालेली चढाई.... हे कैलास पर्वताबाबत लक्षात घेण्याजोगे आहे.
हेही वाचा - महाशिवरात्री 2021 : हर हर महादेव! देशातील 12 ज्योतिर्लिंग; पाहा PHOTO
काय आहेत यामागची कारणे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
असं म्हटलं जातं की कैलाश पर्वतावर चढलेला व्यक्ती काही वेळातच दिशाहीन होतो. आणि दिशाहीन होऊन चढाई करत राहणे म्हणजे एकप्रकारे मृत्यू आमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे आजपर्यंत एकही व्यक्ती पर्वतावर चढू शकला नाहीये. कैलाश पर्वत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पर्वतरोहीने आपल्या पुस्तकात असं लिहून ठेवलंय की, मी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला मात्र, या पर्वतावर राहणे अशक्य होते. तिथे शरीरावरील केस आणि नखे गतीने वाढण्यास सुरवात होते. शिवाय या पर्वत हा सर्वाधिक रेडीओएक्टीव्ह आहे.
11 व्या शतकात एक बौद्ध भिक्खू मिलारेपाने कैलाश पर्वतावर यशस्वी चढाई केली होती, असं म्हणतात. कैलाश पर्वतावर जाऊन जिवंत परतणारे ते एकमेव व्यक्ती असल्याचं म्हणतात. याशिवाय कैलाश पर्वाताच स्लोप हा 65 डिग्रीपेक्षा जास्त आहे. तर माऊंट एव्हरेस्टचा स्लोप 40 ते 60 डिग्रीपर्यंत आहे. म्हणूनच अनेक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट तर चढू शकतात मात्र माऊंट कैलाश चढणे त्यांच्यासाठी कठीण काम आहे.
कैलाश पर्वतावर चढू न शकण्याचं महत्त्वाचं एक कारण आहे ते तिथलं खराब हवामान... त्यानंतर आरोग्य आणि तिथे भटकण्यामुळे हा पर्वंत चढणे आजवर कुणालाही तितकं शक्य झालेलं नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.