खरेदीसाठी जगातील सर्वात प्रसिद्ध देश कोणते आहेत? जाणून घ्या

know world most famous countries for shopping Marathi article
know world most famous countries for shopping Marathi article

शॉपिंग करायला प्रत्येकालाच आवडते, विशेषत: महिलांचा तर तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. शॉपिंगसाठी त्या वेळ आणि पैसा दोन्ही मनसोक्त खर्च करतात. जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हा खास शॉपिंगसाठी प्रसिध्द असलेल्या देशात जाऊ  शकता. यामुळे तुमचे फिरणे आणि शॉपिंग या दोन्हींचा आनंद तुम्हाला एकत्रच घेता येईल. आज आपण जगतल्या कोणत्या देशात कशाची शॉपिंग करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. 

लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क ते सिंगापूर, बँकॉक, तुर्की आणि मलेशिया यासारख्या देशांमध्ये बरेचसे भारतीय पर्यटक फिरायला जातात. तुम्हीदेखील यापैकीच एखाद्या देशात फिरायचे ठरवत असाल तर तेथील वैशिष्ठ्याबद्दल आपल्याला अगोदरच माहित असणे फायदेशीर ठरतो . म्हणजेच, तेथे तुम्ही काय खरेदी करावी आणि त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील, याची कल्पना तुम्हाला आधीच येईल तुम्ही खरेदीचा मनसोक्त आनंद घेता येईल.

पॅरिसमध्ये काय खरेदी करावे

असे म्हणतात की पॅरिसच्या भिंतींनाही सुगंध येतो आणि येथील हा सुगंध जगभरातील पर्यटकांना पॅरिसकडे आकर्षित करतो. तुम्ही देखील पॅरिसला भेट देत असाल तर तुम्हाला पॅरिसचे जेवण तर आवडेलच सोबतच या ठिकाणी मिळणाऱ्या असंख्य वस्तू तुम्हाला जगाच्या पाठिवर इतर कोठेच मिळणार नाहीत. पॅरिस शहरातील सुप्रसिध्द चॉकलेट Angelina नक्की ट्राय करा आणि विकत घेऊन सोबत देखील  घेऊन या.

सोबतच पॅरिसचे साबण देखील खूप लोकप्रिय आहेत. येथे मिळणाऱ्या साबणाचा गंध आणि गुणवत्ता जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. याशिवाय पॅरिसमध्ये जाऊन आपल्या आवडीचा परफ्यूमही बनवून घेऊ शकता. पॅरिस घरीच बनवण्यात येणाऱ्या परफ्यूमसाठी प्रसिद्ध आहे. 

सिंगापूरमध्ये काय खरेदी करावे 

जगातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक असलेल्या सिंगापूरमध्ये येथे चिंगम खाण्यास बंदी आहे. आपण सिंगापूरला जात असाल तर येथे तुम्हाला बरीच सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील, तसेच येथून उत्तम इलेक्ट्रॉनिक उत्पादनेदेखील खरेदी करता येतील. सिंगापूरमध्ये आपल्याला आपले आवडते प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रांड्सचे कपडे, शूज आणि हँड बॅग देखील मिळू शकतात. जगात असे काही मोजकेच देश आहेत जेथे जगातील सर्वात मोठ्या ब्रँडचे ओरिजनल साहित्य मिळते.

बँकॉकमध्ये काय खरेदी करावे

भारतातील लोक म्हणतात की आपण बँकॉकला जात असाल तर रिकामी बॅग घेऊन जा कारण तेथे तुम्हाला खरेदीसाठी इतक्या आहेत की तुम्हाला रिकाम्या बॅग कमी पडतील. बँकॉकमध्ये, चपलांपासून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आपल्याला लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला बँकॉकमध्ये सहज सापडेल.  बँकॉकमध्ये थाई मसाज देखील खूप लोकप्रिय आहे, परंतु आपण तेथे शॉपिंगच्या मूडवरून जात असाल तर तुम्ही अजिबात निराश होणार नाहीत. आपण बँकॉकमधून जगातील सर्वोत्कृष्ट कॉस्मेटिक वस्तूंची खरेदी करू शकता. याशिवाय बँकॉक मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त दरात जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे लाउंजरदेखील मिळेल. 

टर्कीमध्ये काय खरेदी करावे

सुंदर पेंट केलेल्या लँम्प शेड्स, कार्पेट्स, कॉफी, हँडमेड टॉवेल्स, साबण अशा गोष्टी आहेत त्या जर आपण  तुर्की येथून एकदा विकत घेतल्या तर तुम्ही प्रत्येक वेळी त्या खरेदीसाठी तुर्कीला पोहचाल. जगातील बर्‍याच श्रीमंत लोकांना त्यांच्या घरासाठी  तुर्की येथून कर्पेट आणि लँम्प शेड्स आणि डिझाइनर लाइट्स मागवतात. तुर्कीच्या कारागीरांचे कसब इतर ठिकाणी सापडणे कठीण  आहे. 

मलेशियामध्ये काय खरेदी कराल

हॅन्डक्राफ्ट लाकडी बास्केट पासून लेटेस्ट डिझाइनर ब्रँड, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, एलीगेंट मलेशियन गारमेंट इथपर्यंत सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी मलेशियाला जाऊ शकता. येथे आपल्याला मॉडर्न शॉपिंग करण्याचा अनुभव येथे तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तर तुम्हाला मलेशियाला जायला नक्कीच आवडेल. इथल्या कपड्यांची गुणवत्ता देखील अशी आहे की आपल्याला वर्षानुवर्षे ते घालायला आवडतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com