गड किल्ल्यांवर जाण्यापुर्वी हे करा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

गिर्यारोहण करताना अनेक वेळा दुखापती, छोटे मोठे अपघात घडतात. यासाठी ट्रेकींगला जाणाऱ्या नवोदितांना ज्येष्ठांचे अथवा जाणकरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.

महाराष्ट्र, सह्याद्री आणि गिर्यारोहण हे समीकरणच मुळात अतुट आहे. महाराष्ट्राला गिर्यारोहणाची मोठी परंपरा लाभली. ही परंपरा आजची तरुण पिढीही जोपासत आहे. तथापि या सांघिक खेळाकडे तरुणाईचा वाढलेला कल हेच त्याचं प्रमुख कारण आहे. सुरवातीला वीकेंड आउटिंग अशा नावाने बाळसं धरू लागलेल्या या क्षेत्राला पुढे अनेक पैलू पडत गेले. आजचा गिर्यारोहक हा फक्‍त्त रविवारी घरी न बसता कुठेतरी भटकून येऊ यासाठी ट्रेकिंगला जात नाही. कोणी जातो देखण्या दुर्गस्थापत्यांचा अभ्यास करायला तर कोणी भटकतो प्राचीन घाटवाटांचा मागोवा घ्यायला. कोणाला सृष्टीसौंदर्य कॅमेऱ्यात टिपायला आवडतं तर कोण फिरतो रानपाखरांशी संवाद साधायला. थोडक्‍यात या ना त्या कारणाने सह्याद्रीची आणि तरुणाईची नाळ कायमची जोडली गेली आहे. आजच्या मॅनेजमेंटच्या जमान्यात सांधिक गिर्यारोहणाकडे तरुण पिढी आकर्षित झाली आहे आणि हेच गिर्यारोहण क्षेत्राचं खरं यश म्हणावं लागेल. गिर्यारोहण करताना अनेक वेळा दुखापती, छोटे मोठे अपघात घडतात. यासाठी ट्रेकींगला जाणाऱ्या नवोदितांना ज्येष्ठांचे अथवा जाणकरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.

ज्या किल्ल्यावर जाणार आहात त्याची सखोल माहिती घेणे. तेथे जाण्यासाठी मार्ग कोणते त्याची माहिती घ्यावी. शहरापासून लांब असल्यास तेथील वाहन व्यवस्थेची माहिती घ्यावी. किल्ल्यानजीकच्या गावात निवास व्यवस्थेची माहिती घ्या. दुर्गम किल्ला निवडल्यास वाटाड्याची मदत घेणे. पाण्याच्या बाटल्या. न्याहारीची व्यवस्था. प्रखर प्रकाश असलेली टॉर्च. उन्हापासून सरंक्षणासाठी टोपी, गॉगल. उंच कड्यावरुन सेल्फी काढणे टाळावे. दोरखंड जवळ बाळगा. प्रथोमपचार पेटी. स्थानिक किल्ल्यांवर परवानगी असल्यास चाकू न्या.

अतिउंचीवर ट्रेकला जाताना हे करावे 

शारीरिक व मानसिक तयारी पाणी कमी पिणे हातपाय 
पाठपोटांच्या स्नायूंची बळकट करणे 
उत्तम प्रतीचे कपडे, बूट्‌स यांचा वापर करणे 
संपर्काची अत्याधुनिक साधने जवळ बाळगणे 
हवामानाचे ताजे अंदाज सतत मिळवत राहणे 
मोहिमेची उत्तम पूर्वतयारी करणे 

अतिउंचीवर ट्रेकला जाताना हे करू नये 

डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे जवळ बाळगणे, त्यांचे सेवन करणे 
आपल्या शारीरिक क्षमतांचा अंदाज नसणे 
प्रथमोपचार पेटी जवळ नसणे 
लहरी हवामानाकडे दुर्लक्ष करणे 
मोहिमेच्या/ ट्रेकिंगच्या आराखड्याचे तंतोतंत पालन न करणे  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plan Before You Go For Trekking On Forts