कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचंय? तर या देशांमध्ये आहे भारतीय करंन्सीची किंमत जास्त

टीम ईसकाळ
Thursday, 18 February 2021

भारतापासून कमी-अधीक अंतरावर असलेल्या या देशांच्या करंन्सीची किंमत ही भारतीय रुपयापेक्षा कितीतरी कमी आहे, त्यामुळे हे देश तुमच्या पर्यटनाच्या  बजेटमध्ये नक्कीच बसू शकतात. या देशांमध्ये अगदी कमी पैशात तुम्ही तुमची फिरण्याची हौस पुर्ण करु शकतात. तर आज आपण अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. 

मध्यमवर्गीय लोक परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न पाहातात. पण परदेशात पर्यटनासाठी जाणे त्यांच्या खिशाला  परवडणार नाही म्हणून तो विचार त्यांना सोडून द्यावा लागतो. पण भारताबाहेर फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी असे कितीतरी देश आहेत  ज्या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये देखील फिरुन येऊ शकता. 

भारतापासून कमी-अधीक अंतरावर असलेल्या या देशांच्या करंन्सीची किंमत ही भारतीय रुपयापेक्षा कितीतरी कमी आहे, त्यामुळे हे देश तुमच्या पर्यटनाच्या  बजेटमध्ये नक्कीच बसू शकतात. या देशांमध्ये अगदी कमी पैशात तुम्ही तुमची फिरण्याची हौस पुर्ण करु शकतात. तर आज आपण अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. 

नेपाळ

जर तुमच्याकडे पैसे आणि वेळ या दोन्हीची कमतरता आहे, तर तुम्ही भारताचा शेजारी देश नेपाळच्या ट्रिपला आरामात जाऊ शकता. आनंदाची गोष्ट म्ङणजे तुम्ही नेपाळला जाण्यासाठी चक्क बसचा देखील वापर करू शकता. नेपाळसाठी भारतातून अनेक बससेवा उपलब्ध आहेत. नेपाळमध्ये भारतीय एक रुपयाचा एक्सचेंज रेट १.६० नेपाळी रुपया आहे. तसेच नेपाळमध्ये सुंदर डोंगररांगा, मंदिरे, मठांचे सैंदर्य पाहण्याजोगे आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंग देखील करु शकता. 

श्रीलंका

बऱ्याच जणांच्या अनुभवांनुसार भारतात केरळची ट्रिप ही श्रीलंकेच्या तुलनेत महाग आहे. श्रीलंकेत आपला एक रुपया २.३० श्रीलंकन रुपयांच्या बरोबर आहे.  त्यामुळे तुम्ही श्रीलंकेत दुप्पट पैसे खर्च करु शकाल. श्रीलंकेत पाहाण्यासाठी असंख्य पर्यटनस्थळे आहेत. 'एला' हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना भुरळ घालते. तुम्हीदेखील परदेशवारी ती देखील बजेट मध्ये करु इच्छीत असाल तर श्रीलंका हा चांगला पर्याय आहे. 

व्हियतनाम

भारतीयांसाठी स्वस्त असणाऱ्या देशांच्या यादीत व्हियतनामचे नाव देखील आहे. येथे एक रुपयाची किंमत जवळपास ३३४.६८ व्हियतनामी दोंग आहे येथे तुम्ही अगदी मनमुराद शॉपिंग करु शकता. 

जापान

जर तुम्हाला खरंच सुंदरता अनुभवायची असेल तर तुम्ही जापानला भेट देऊ शकता. अत्यंत प्रगत असलेला हा देश असून येथे आपल्या एक रुपयाची किंमत १.६० येन इतकी आहे. त्यामुळे जपानची ट्रिप देखील तुमच्यासाठी कमालीची स्वस्त ठरु शकते. 

हंगेरी 

अनेक लोक युरोप फिरण्याचे  स्वप्न बघतात, पण युरोपात फिरणे खूप महाग असेल असे वाटल्याने त्यांचे ते स्वप्न कधीच पुर्ण होत नाही. युरोपमध्येदेखील अशी काही ठिकाणे आहेत जे तुम्ही कमी पैशांमध्ये देखील फिरु शकता. हंगेरी असाच एक देश आहे, येथे एक रुपयाची किंमत ही ४.१२ हंगेरियन फोरिंट आहे. तुम्ही कमी पैशात आरामात हा देश फिरु शकता. 

इंडोनेशिया

हा देश तर फिरण्यासाठी खूपच स्वस्त आहे १ इंडोनेशियाई रुपयाची किंमत ०.००४८ इतकी आहे. जास्त दिवसांच्या ट्रिपवर जाणाऱ्यांसाठी इंडोनेशिया हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बालीचे बीच, सुंदर समुद्रकिनारे अगदी कमी  बजेटमध्ये फिरणे शक्य होते. 

कोस्टा रिका 

परदेशात निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही कोस्टा रिकाचे टिकीट बुक करु शकता. हे ठिकाण इतके स्वस्त आहे की, या  ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला विचार करण्याची गरजच नाही. येथे एक रुपयाची किंमत ८.२६ कोस्टा रिकन कोलोन आहे. 

कंबोडिया

परदेशात फिरण्यासाठी कंबोडियापेक्षा स्वस्त ठिकाण दुसरे असूच शकत नाही. तुम्ही या ठिकाणी एडव्हेंचर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता. कंबोडिया स्वस्त असल्याने तुम्ही इथे मनपसंत शॉपिंग करु शकता. या ठिकाणी एक रुपयाची  किंमत ६० कंबोडियन रिएल इतकी आहे. 

मंगोलिया

फिरण्यासोबतच एडव्हेंचरची आवड असेल तर तुम्ही मंगोलिया या देशात देखील फिरायला जाऊ शकता. मंगोलियाची संस्कृती तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल. मंगोलिया हे ठिकाण इतके स्वस्त आहे की तुम्ही या देशात वारंवार फिरायला जाऊ शकता. येथे भारतीय एक रुपयाची किंमत ३५.५ मंगोलियन टगरिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are the cheapest countries to visit for Indian tourists Marathi news story