आयुष्यात काहीतरी एडव्हेंचर करायचंय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

टीम ईसकाळ
Thursday, 18 February 2021

तुम्हीदेखील आयुष्यात अडव्हेंचर टूरवर जायचा प्लॅन करत असाल तर जगातील या सात ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता. या ठिकाणी केलेल्या अडव्हेंचरचा अनुभव तुम्ही हमखास जीवनभर विसरणार नाहीत. जाणून घेऊयात या भन्नाट ठिकाणांबद्दल..

दररोजच्या व्यापातून बाहेर पडून जगभर प्रवास करण्याचे, कुठल्यातरी एडव्हेंचर टूरवर निघून जाण्याचे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. पण एकतर कामाच्या व्यापातून त्यांची सुटका होत नाही, दुसरे नेमके कुठे जावे हे देखील लवकर ठरत नाही. तुम्हीदेखील आयुष्यात अडव्हेंचर टूरवर जायचा प्लॅन करत असाल तर जगातील या सात ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता. या ठिकाणी केलेल्या अडव्हेंचरचा अनुभव तुम्ही हमखास जीवनभर विसरणार नाहीत. जाणून घेऊयात या भन्नाट ठिकाणांबद्दल..

ग्रेट बॅरियर रीफ मध्ये स्विमींग

अडव्हेंचरची आवड असलेल्या जगभरातील शौकिन मंडळींच्या यादीत हे ठिकाण पहिल्या क्रमांकावर आहे. ग्रेट बॅरियर रीफ या ठिकणी पंधराशेपेक्षा देखील जास्त प्रजातींचे मासे आणि कोरल तुम्हाला पहायला मिळतील. या विविधतेने नटलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. हे सुंदर अनुभव तुम्ही जन्मभर विसरणार नाहीत.

माउंट  एव्हरेस्टची चढाई

जगभरातील गिर्यारोहक माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पाहतात, जर तुम्हाला एडव्हेंचर आवडत असेल तर तुम्ही देखील हे शिखर चढण्याचा प्रयत्न करु शकता. या अत्यंत कठीण चढाईसाठी द्यावा लागणारा वेळ असेल तर हे तुमच्या आयुष्यातील सर्वात थ्रीलिंग एडव्हेंचर ठरु शकते. 

जगतल्या सगळ्यात उंच दरीत उडी 

जर तुम्हीला क्लिफ जंपीग हा प्रकार पसंत असेल तर तुम्ही जगातील सगळ्यात उंच कड्यावरुन खाली उडी मारण्याचा आनंद घेऊ शकता. न्यूझिलंडच्या क्वींसटाऊन या ठिकाणाला जगभरातील पर्यटक खास यासाठी भेट देतात. येथील शॉटओवर कैनियन स्विंग हा जगातील सर्वात उंच क्किफ जंप पॉंईट आहे. येथे तुम्ही 650 फुट केबलच्या मदतीने नदीत उडी घेऊ शकता. 

ग्रेट वॉल ऑफ चाईना

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेली ग्रेट वॉल ऑफ चाईना पाहाण्यासाठी हजारो पर्यटक जगभरातून जातात. तुम्ही देखील या भींतीवर ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. या ट्रेक दरम्यान अशा अनेक जागा आहेत ज्या तुमच्या ट्रेकिंग स्किलसाठी चॅलेंज ठरतील. 

दुबईत स्कायडाइव्हिंग

जर तुम्हाला स्कायडायव्हिंग आवडत असेल तर तुम्ही दुबईत त्याचा आनंद घेऊ शकता. तज्ञ लोकांच्या उपस्थितीत विमानातून केलेला फ्रि फॉल तुम्हाल यादगार अनुभव देईल. हा अनुभव नक्कीच तुम्हाला जन्मभर लक्षात राहील. 

नॉर्दन लाईट्सचा जादुई अनुभव

नॉर्दन लाईट्सच्या रंगबेरंगी आकाशाखाली झोपण्याचा अनुभव शब्दात वर्णन करता येण्यापलीकडे आहे. निसर्गाचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी जगभरातून लोक नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड यासारख्य देशांमध्ये जातात, नॉर्दन लाईट्स हे वर्षातील ठराविक हवामान, ठिकाण आणि वर्षातील ठराविक वेळ या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे हे दुर्लभ दृष्य पाहायची असतील तर हवामानाचा अंदाज घ्यावा लागेल. 

सहारा वाळवंटात सँड सर्फिंग

सहारा वाळवंटात वाळूच्या बेटांवर वेगवेगळ्या खेळांसाठी लोक जगभरातून प्रवास करतात. येथे सर्फिंग आणि सँडबोर्डिंग करणे अनोखा अनुभव आहे. त्यासोबत तुम्ही वाळवंटातील जीवनाचा अनुभव देखील घेऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are the most extreme adventure places to visit Marathi story