बीचवर फिरायला जायचंय? हे आहेत मुंबईच्या जवळचे बेस्ट बीच ऑप्शन्स

टीम ईसकाळ
Friday, 19 February 2021

जर तुम्ही मुंबईत राहात असाल तर दरवेळी बीचवर फिरायला जाण्याची इच्छा झासी की, तुम्हाला गोव्याला जाणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही मुंबईच्या जवळपास असलेल्या बीचवर फिरायला जाऊ शकता. मुंबईच्या जवळ देखील अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा विकेंड अगदी मजेत घालवू शकता. चला तर  मग मुंबईच्या जवळपास असलेल्या काही बीचस बद्दल जाणून घेऊयात...

समुद्र किनारा कायम पर्यटकांना आकर्षीत करतो, समुद्राच्या कडेला लाटा पाहात बसणे कित्येकांसाठी परवणी असते. स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्या घालवण्यााठी कुठे जायचं? हा प्रश्न आला की पहिल्यांदा आठवतो तो गोवा. पण जर तुम्ही मुंबईत राहात असाल तर दरवेळी बीचवर फिरायला जाण्याची इच्छा झासी की, तुम्हाला गोव्याला जाणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही मुंबईच्या जवळपास असलेल्या बीचवर फिरायला जाऊ शकता. मुंबईच्या जवळ देखील अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा विकेंड अगदी मजेत घालवू शकता. चला तर  मग मुंबईच्या जवळपास असलेल्या काही बीचस बद्दल जाणून घेऊयात...

मनोरी बीच
हा बीच मुंबईपासून फक्त ३६ किलोमिचर अंतरवर आहे. शहराच्या जवळ असलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये मनोरी बीचचा समावेश होतो. पर्यटकांमध्ये प्रसिध्द असलेल्या या बीचला लोक 'मिनी गोवा' असेही म्हणतात.  येथे जेवणाची उत्तम सोय असणारे रेस्टॉरंट तर आहेतच, त्यासोबत स्विमिंग आणि बोटीत बसून समुद्राचा फेरफटका मारण्याचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. 

मारवे बीच
मुंबईच्या जवळ असलेला हा बीच देखील विकेंडसाठी पर्यटकांच्या पसंतीला उतरतो. येथे रात्री चालणाऱ्या फुलमून नाईट पार्टीसाठी ही बीच चांगलाच प्रसिध्द आहे. शहराच्या गर्दीपासून दूर, पिकनीकसाठी हा बीच परफेक्ट डेस्टीनेशन आहे. तुम्ही या ठिकाणी स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. 

वसई बीच
मुंबईपासून ६८ किमी अंतरावर असलेला वसई बीच हा देखील एक दिवसाच्या पिकनीकसाठी परफेक्ट जागा आहे. सुंदर समुद्रकिनारी तुम्ही कुटुंबासोबत अगदी आनंदात विकेंड घालवू शकता. हा बीच निळा समुद्र आणि पांढरी रेती या दोन गोष्टींसाठी ओळखला जातो. अगदी शांत वातावरण असलल्या या बीचवर फिरण्यासोबतच तुम्ही वसई किल्ला, रेमेडी चर्च, हेदवडे महालक्ष्मी मंदिर आणि वसई बंदर इत्यादी ठिकाणे देखील जाऊ शकता. 

अलीबाग बीच
मुंबईकरांना तुलनेने थोडा दूर असा हा शहरापासून ९२ किमी अंतरावर आहे. पण मुंबईच्या जवळ निळाशार समुद्र,  काळी रेती असणारा समुद्रकिनारा असलेला हा बीच  एक परफेक्ट ऑप्शन आहे. अलीबागला नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचा काळ हा बीचवर फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो. या बीचवर तुम्ही कुलाबा फोर्टमध्ये फेरीची सफर, काइट सर्फिंग आणि पॅराग्लायडींगसारख्या भन्नाट गोष्टींचा देखील आनंद घेऊ शकता. 

केळवा बीच
मुंबईपासून जवळपास १०३ किमी अंतरावर हा बीच आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात असलेल्या या बीचवर वर्षभरात हजारो पर्यटक फिरायला येतात. येथे प्रसिध्द शांता देवी मंदीराला देखील तुम्ही भेट देऊ शकता सोबतच केळवा फोर्टला उंटवर फेरी आणि समुद्र किनाऱ्यावर घोड्याची सवारीचा आनंद घेऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are some best beaches near Mumbai Marathi story