चार दिवसांसाठी ट्रिपचे नियोजन आहे! तर चला महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

Maharashtras Best Tourist Places
Maharashtras Best Tourist Places

तुम्ही जर महाराष्ट्रात असाल, तर दोन-चार दिवसांच्या ट्रिपवर जायची इच्छा आहे. तर तुम्हाला आम्ही येथे अशा चार पर्यटनस्थळांविषयी सांगणार आहोत.
महाराष्ट्रात केवळ चार दिवसांमध्ये फिरुन होईल अशी सर्वोत्तम पर्यटनस्थळे...

तारकर्ली
तारकर्ली जाऊन या किंवा पूर्ण मालवण फिरा. निळा समुद्र आणि दूर-दूरपर्यंत पांढरी रेती अनेक महिन्यांचा तुमचा थकवा काही क्षणांत घालवून टाकेल. काही वेगळ करायचे आहे तर येथे स्कूबा डायव्हिंग, पॅरा सेलिंगचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. मालवणी खाद्यपदार्थांचा नादच खुळा आहे.


भीमाशंकर
सह्याद्रीच्या डोंगरात भीमाशंकरचे मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उंचावर असलेले हे मंदिर दगडांचे आहे. त्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. चोहूबाजूंनी हिरवळ आणि दूर-दूरपर्यंत केवळ डोंगरच डोंगर दिसतात. या व्यतिरिक्त इतर मंदिरांच्या तुलनेत येथे गर्दीही खूप कमी असते. येथील वातावरण मेडिटेशनसाठी योग्य आहे. जवळच्या सोलनपाडा धरणही फिरु शकता.


लोणार झील
बुलडाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे निसर्गाचे अप्रतिम भेट आहे. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातापासून या सरोवराची निर्मिती झाली आहे. तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये सर्वांत वर हवे. सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दुर्गम रस्त्यांमधून जावे लागेल. जवळपास अनेक प्राचीन मंदिरेही आहेत. ज्यात खजुराहोप्रमाणे कलाकृतिया पाहायला मिळतात.     

ताडोबा राष्ट्रीय उद्यान
तुम्ही वन्यजीवा प्रेमी असाल तर चंद्रपूरमधील ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा फेरफटका मारुन यायला हवे. वाघ पाहण्याची इच्छा असेल तर हे उद्यान तुम्हाला निराश करणार नाही. येथे टायगर सफारीची सुविधा आहे. वृक्ष व वन्यजीवांमध्ये विशेष रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी पूर्णपणे उपयुक्त आहे. हरिण, लांडगे, पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजातीही येथे पाहायला मिळू शकते.

महाबळेश्वर
डोंगर, थंड हवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही महाबळेश्वरला भेट देऊ शकता. येथील रोमँटिक माहौलमध्ये बरोबर पार्टनर असेल तर मग आणखी काय पाहिजे? सूर्योदय डोळ्यांत साठवण्यासाठी नक्की एकदा भेट द्या. येथे नौकानयन आणि ट्रेकिंगही करु शकता. निवांत अशा चार दिवसांसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

औरंगाबाद
युनिस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले वेरुळच्या लेण्या पाहू शकता. येथील हिवाईने नटलेले उद्याने आणि सरोवरे तुम्ही निसर्गाचे जवळ असल्याची अनुभूती देईल. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी तुमच्या मुलांना नक्की घेऊन जा.

नाशिक
नाशिक हे केवळ तीर्थक्षेत्र नाही. येथे फिरण्यासाठी अनेक चांगली पर्यटनस्थळे आहेत. अंजनेरी डोंगरावर तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. केवळ निवांत हवा असेल तर धम्मगिरीत दोन दिवस घालवा. वाईन बनवताना पाहणे हे तुमच्यासाठी वेगळी अनुभूती ठरले. पंचवटी तुमची आध्यमिक तृष्णा भागवेल. एखादी संध्याकाळ गोदावरी काठी अवश्य घालवा.

पाचगणी
पाचगणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे थंडहवेचे ठिकाण. सकाळी लवकर उठून डोंगरांमधून सूर्योदय पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडल. जर कोणाला उशीर उठण्याची सवय असेल त्यांना सूर्यास्तही निराश करणार नाही.  

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com