२०२२ साली पर्यटक करु शकतील अंतराळाची सफर, जाणून घ्या सविस्तर

tourists will be able to visit space in 2022 Marathi article
tourists will be able to visit space in 2022 Marathi article

विज्ञानाच्या क्षेत्रात दररोज काहीतरी नवीन घडत असते, काही वर्षांपुर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज आपण अगदी सहज करु शकतो. सध्या जगाला वेध लागले आहेत ते अंतराळात प्रवास करण्याचे. बऱ्याच जणांचे स्वप्न असते की कधीतरी अंतराळात प्रवास करण्याची संधी मिळावी, अशा लोकांसाठी चांगली बातमी आली आहे.

वृत्तानुसार, जर सर्व काही व्यवस्थित झाले तर 2022 पासून, रिचर्ड ब्रॅन्सनचे व्हर्जिन गॅलॅक्टिक अंतराळ यान प्रथमच पर्यटकांना 90 मिनिटांसाठी अंतराळात घेऊन जाणार आहे. स्पेसक्रॉफ्ट कंपनीने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या व्हर्च्युअल टूर व्हिडिओद्वारे याची माहिती दिली आहे.  त्यानुसार वीएसएस यूनिटीला हे अंतराळ यान खास अंतराळात प्रवासासाठी डिझाईन करण्यात आले होते. 

याची वेशिष्ट्ये काय आहेत?

या वीएसएस यूनिटी स्पेसशीपमध्ये 6 प्रवासी प्रवास करू शकतात. तसेच दोन चालक सदस्य देखील प्रवास करणार आहेत. प्रवाशांच्या जाडी, उंची आणि वजनानुसार हे शिप डिझाइन केले आहे. यातील सर्व प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यात येणार आहे. याच्या मदतीने प्रवासी पायलटशी संपर्क साधू शकतात. स्पेसशिपला असलेल्या खिडक्यांमधून प्रवाशांना अंतराळ पाहाता येणार आहे. हे स्पेसशिप पृथ्वीपासून 97 किलोमीटरच्या उंचीवर जाईल.

मोबाइल घरीच ठेवावा लागेल

प्रवाशांना त्यांच्या सोबत मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे मोबाईल प्रवाशांचे नुकसान करू शकतो.  याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी म्हणाले की प्रवाशांना सेल्फी काढण्यासाठी वाहनात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मोबईल घरीच ठेववे लागल्याने त्यांना दुखः होण्याची गरज नाही.  तसेच, इतर दोन  कॅमेरे कायम रेकॉर्डिंग मोडमध्ये राहतील.

अंतराळात चालण्याचा आनंद

प्रवासी वाहनात स्पेस सूट उघडून परवानगी दिलेल्या जागांवर चालण्याची अनुभव देखील घेऊ शकणार आहेत. आतापासूनच 60 प्रवाश्यांनी अंतराळ चालण्यासाठी साइन अप केले आहे. त्यासाठी तिकिटाची किंमत 2 लाख 50 हजार डॉलर्स मोजावी लाणार आहे. हे अवकाश यान न्यू मेक्सिको येथून उड्डाण करेल. यापूर्वी हे स्पेसशिप 2020 मध्ये अवकाशात जाणार होते, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रवासाची तारीख बदलण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com