आलिशान ‘गोल्डन चॅरिअट’ मधून करा दक्षिण भारताची सफर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

‘गोल्डन चॅरिअट’ ही देशातील आलिशान रेल्वे दक्षिण भारताच्या सहलीसाठी पर्यटकांच्या दिमतीला पुन्हा येणार आहे. काही वर्षांच्या खंडानंतर ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतीय ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (आयआरसीटीसी) घेतला आहे. कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ (केएसटीडीसी) आणि ‘आयआरसीटीसी’मध्ये ही खास रेल्वे सुरू करण्याचा करार नुकताच झाला.

‘गोल्डन चॅरिअट’ ही देशातील आलिशान रेल्वे दक्षिण भारताच्या सहलीसाठी पर्यटकांच्या दिमतीला पुन्हा येणार आहे. काही वर्षांच्या खंडानंतर ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतीय ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (आयआरसीटीसी) घेतला आहे. कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ (केएसटीडीसी) आणि ‘आयआरसीटीसी’मध्ये ही खास रेल्वे सुरू करण्याचा करार नुकताच झाला. पूर्वी २००८ मध्ये ही गाडी सुरू करण्यात आली होती. ही रेल्वे देशातील महागड्या रेल्वेपैकी एक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘गोल्डन चॅरिअट’मधील सुविधा

 • एकूण १८ डब्यांमध्ये ४४ खोल्या
 • एकावेळी ८४ पर्यटक प्रवास करणार
 • ‘प्राइड ऑफ कर्नाटक’अंतर्गत तीन सहली
 • २२ व २९ मार्च आणि २१ एप्रिल २०२० या दिवशी गाडी धावेल
 • प्रत्येक सहल ही सहा रात्री आणि सात दिवसांची
 • यशवंतपूर (बंगळूर) रेल्वे स्थानकाहून सकाळी प्रवासाला सुरुवात
 • सहलीत बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, म्हैसूर, हळेबिडू, चिकमंगळूर, हंपी, बदामी-पट्टदकल- ऐहोळे, गोवा या येथील पर्यटन स्थळांचा समावेश 
 • आंतरराष्ट्रीय रेल्वे पर्यटकांच्या आवडीनुसार रेल्वेचा कायापालट केला आहे
 • रेल्वेतील फर्निचर, आसनव्यवस्था, खोल्या, स्वच्छतागृहांचे रूप पालटले आहे. यासाठी वापरलेले साहित्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आहे. 
 • स्‍मार्ट टीव्ही, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉन आदींचा समावेश असलेली वाय-फाय सेवा
 • सुरक्षेसाठी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व आग प्रतिबंध यंत्रणा
 • मनःशांतीसाठी ‘स्पा’ थेरपी उपलब्ध
 • व्यायामप्रेमी पर्यटकांसाठी अद्ययावत उपकरणे
 • सहलीच्या शुल्कात रेल्वे प्रवासातील भोजन, गाईड, वातानुकूलित बस, पर्यटन स्थळांचे शुल्क व बाहेर भोजनाचा समावेश

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel south to India through the luxurious Golden Chariot train