सेलिब्रिटी वीकएण्ड : भटकंती खूप आवडते

प्राजक्ता माळी, अभिनेत्री
Friday, 3 April 2020

माझ्यासाठी वीकएंड म्हणजे स्वतःसाठी दिलेला वेळ. सहसा चित्रीकरणापासून फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळं प्रत्येक आठवड्याला बाहेर जाणं शक्य नसतं, पण शक्य होते, तेव्हा मी स्वतःसाठी खूप वेळ देते. सोमवार ते शुक्रवार चित्रीकरण केल्यानंतर वीकएंडला वेळ मिळाल्यावर मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहते. मला चित्रपट पाहायला फार आवडतात आणि तेही चित्रपटगृहात जाऊनच.

याशिवाय मी घरी थांबून पुस्तकं आणि वेबसिरिज पाहते. कधीकधी मला मुंबई बाहेर जायला देखील आवडतं. त्यासाठी मी निसर्गरम्य ठिकाण निवडते. निसर्गरम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यावर मी रिफ्रेश होते. मला कधीही सारखं एकाच ठिकाणी जायला आवडत नाही. मला वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळं जेवण, वेगवेगळी रेस्टॉरंट्स ट्राय करायला आवडतात.

मित्रमैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत मी माझा वीकएंड घालवते. मला भटकंती करायला खूप आवडते. माझ्या आताच्या वीकएंडला मी माझ्या ‘झी युवा’ वाहिनीवरील ''मस्त महाराष्ट्र'' या ट्रॅव्हल शोच्या चित्रीकरणात व्यग्र होते. त्यामुळं मला स्वतःसाठी फारसा वेळ देता आला नाही, पण या शोच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. मुंबईपासून आम्ही या शोची सुरुवात केली व  ताडोबापर्यंतची सर्व ठिकाणी या मी शोच्या निमित्तानं फिरले. 
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wandering is a favorite prajakta mali