वीकएण्ड पर्यटन :  अजिंक्‍य मुरुड, जंजिरा किल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

रायगड जिल्ह्यामध्ये काही जलदुर्ग आहेत. त्यांपैकीच एक अभेद्य जंजिरा किल्ला. जंजिऱ्याचा अर्थच आहे समुद्राने वेढलेला किल्ला. अरबी भाषेत त्याला जझिरा म्हणत असत, त्याचा अर्थ बेट.

रायगड जिल्ह्यामध्ये काही जलदुर्ग आहेत. त्यांपैकीच एक अभेद्य जंजिरा किल्ला. जंजिऱ्याचा अर्थच आहे समुद्राने वेढलेला किल्ला. अरबी भाषेत त्याला जझिरा म्हणत असत, त्याचा अर्थ बेट. राजापुरी खाडीच्या मुखावर अगदी मोक्‍याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किल्ल्याच्या तटावरील ५७२ तोफांमुळं जंजिरा अभेद्य ठरला होता. या तोफांमध्ये ४० फूट लांबीची एक जंगी आणि लांब पल्ल्याची तोफ आहे आणि तिचं नाव आहे कलालबांगडी. त्याशिवाय चावडी आणि लांडा कासम नावाच्या आणखी दोन जबरदस्त तोफा होत्या. किल्ल्यात जाण्यासाठी राजापुरी गावातून रोज होड्या सुटतात. प्रवेशद्वारावर गजान्तलक्ष्मीचं शिल्प आहे. या दरवाजावर नगारखाना आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर कलालबांगडी आणि इतर तोफा दिसतात. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डावीकडे पीरपंचायतनची वास्तू आहे. इथून जवळच घोड्यांची पागा आहे. पुढे गेल्यावर पडझड झालेली तीन मजली वास्तू दिसते. सुरुलखानाचा वाडा या नावाने ती ओळखली जाते. वाड्याच्या उत्तरेला मोठा गोड्या पाण्याचा षटकोनी आकाराचा तलाव आहे. त्याच्या चार कोपऱ्यांत चार हौद आहेत. बालेकिल्ल्याच्या मागे सदरेची चुनेगच्ची इमारत आहे. किल्ल्याच्या पश्‍चिमेला तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दर्या दरवाजा असून संकटकाळी इथून बाहेर पडता येत असे. किल्ल्याला एकूण २२ बुरूज आहेत. आजही ते सुस्थितीत आहेत. किल्ला पाहण्यासाठी तीन तास लागतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कसे जाल? - पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे सुमारे १६६ किलोमीटर. मुंबईहून सुमारे १६० किलोमीटर आहे. मुरुडमध्ये निवास आणि भोजनासाठी अनेक हॉटेल आणि उपाहारगृहे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekend Tourism article about Ajinkya Murud, Janjira Fort