
Indian Army: सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. विमान प्रवासातला एक प्रसंग आहे. हा प्रसंग वाचून कुणाचेही डोळे पाणावतील. पैशांच्या कारणामुळे देशाचे सैनिकांनी जेवण न मागवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एका सहप्रवाशाने सर्वांना जेवण दिलं. मग विमानातल्या अनेकांनी आपल्या परीने त्या दानशूर व्यक्तीला मदत केली. कुणी स्वतःच्या भावना लिहून व्यक्त केल्या. ही मूळ हिंदी भाषेतली पोस्ट आहे. इक्बाल सिंग शेरगिल यांनी स्वतःच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट लिहिली आहे. म्हणजे हे दानशूर व्यक्ती तेच असल्याचं दिसून येतंय. या पोस्टचा काहींनी मराठीत अनुवाद केलेला आहे. विशाल अडे या युजरने मराठीतला अनुदाव शेअर केला आहे.