Travel Tips : थायलंड, मलेशियासाठी लवकरच विमानसेवा , जूनपासून तिकीट विक्री सुरू

छत्रपती संभाजीनगरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी तेथील सुविधा आणि सेवांची पाहणी केली.
Travel Tips
Travel TipsSakal

Travel Tips : एअर एशिया एअरलाइन्सच्या टीमने शुक्रवारी (ता. तीन) चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. छत्रपती संभाजीनगरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी तेथील सुविधा आणि सेवांची पाहणी केली. थायलंड आणि मलेशियासाठी विमानसेवा सुरु करण्याची चाचपणी या पथकाने केली.

एअर एशिया एअरलाइन्सच्या पश्चिम आणि दक्षिण भारताचे रिजनल सेल्स हेड किशोर नुनावथ यांच्यासह पथकाने विमानतळाचा इमिग्रेशन आणि कस्टम विभाग, सुरक्षा होल्ड क्षेत्र आणि बॅगेज क्लेम क्षेत्र तसेच विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय निर्गमन आणि आंतरराष्ट्रीय आगमन विभागांना भेट देत माहिती जाणून घेतली.

या शिष्टमंडळाने विमानतळ संचालक शरद येवले, नागरी विमान वाहतूक समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी, एटीडीएफचे अध्यक्ष जसवंत सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर एअर एशिया टीमने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु केल्यानंतर मिळणाऱ्या प्रवाशी वर्गाचा आणि उड्डाण क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी स्थानिक ट्रॅव्हल एजंट आणि उद्योग संघटनांचीही भेट घेतली.

Travel Tips
Summer Travel : मे महिन्यात कूल राहायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन, ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

सुरवातीला बॅंकॉकसाठी सेवा चिकलठाणा विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला थायलंडची राजधानी बँकॉक आणि दुसऱ्या टप्प्यात मलेशियाची राजधानी क्वालालंपूर अशी विमानसेवा सुरु करण्याचा मानस या शिष्टमंडळाने व्यक्त केला. साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही सेवा सुरु करण्याची तयारी कंपनीने केली आहे. नविन विमानसेवेशी संबंधीत सर्व परवानग्या आणि आवश्यक सोईसुविधांची तयारी झाल्यानंतर एअर एशियाच्या अधिकृत वेबसाईटवर साधारण जुन पासून ऑनालाईन तिकीट विक्रीला प्रारंभ होणार आहे.

Travel Tips
Tirupati Balaji Travel : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com