
What to carry for Ashadhi Wari 2025: आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपुरसाठी दुपारुन होणार आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे. 'विठ्ठल' नावाचा गजर आणि आषाढी वारीचा उत्साह यंदा लाखो भाविकांच्या हृदयात नवचैतन्य निर्माण करत आहे.
आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे, जिथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात. यंदा वारीला जाण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
शारीरिक तयारी, योग्य नियोजन, आरोग्याची काळजी आणि भक्तीचा उत्साह यांचा संगम तुमची वारी स्मरणीय बनवेल. यंदा वारीला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.