Monsoon Tourism : पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Belgaum Monsoon Tourism : बेळगाव ग्रामीणमध्ये धबधबे आहेत. शहरी पर्यटक ग्रामीण भागाकडे येतात.
Belgaum Monsoon Tourism
Belgaum Monsoon Tourismesakal
Summary

दोनच दिवसांपूर्वी पुणे येथील भुशी धरणाच्या प्रवाहात पर्यटक कुटुंब वाहून जाण्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांनीही याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

बेळगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांचा (Belgaum Monsoon Tourism) ओढा धबधब्यांकडे वळतो. बेळगाव जिल्ह्यात अनेक धबधबे (Belgaum Waterfalls) आहेत. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे. अतिउत्साहीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. काळजी घेऊन वर्षा पर्यटन करणे आवश्‍यक आहे.

Belgaum Monsoon Tourism
Raghuveer Ghat : दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने पांघरला 'हिरवा शालू'; निसर्ग सौंदर्यात 27 हून अधिक धबधब्यांची भर

दोनच दिवसांपूर्वी पुणे येथील भुसी धरणाच्या प्रवाहात पर्यटक कुटुंब वाहून जाण्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांनीही याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये धबधबे आहेत. शहरी पर्यटक ग्रामीण भागाकडे येतात. काही बेजबाबदार पर्यटक या स्थळांची नासधूस आणि प्रदूषण करतात. तेथील गावकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार रोखण्यासाठी या पिकनिक स्थळांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक असणे गरजचे आहे.

जिल्ह्यांत धबधब्यांची संख्या अधिक आहे. धबधब्यांचे रूपडे लांब अंतरावरून डोळ्यांत साठवावे. धबधब्यांजवळ जाणे टाळावे. पावसाळ्यात अनेकदा वीज खंडित होण्याची शक्यता असते. तेव्हा तुमचा फोन तर चार्ज असावाच. पण, तुमच्याकडे पॉवर बँक असावी.

Belgaum Monsoon Tourism
Piles Symptoms : मूळव्याध, फिशर, फिस्टुला कोणता आहे आजार? याची कशी होते सुरुवात आणि काय आहेत लक्षणे?

प्रवासात यादृष्टीने काही औषधे

सोबत ठेवावीत. पावसाळा सुरू झाल्यावर अनेक लोक ट्रेकिंगला आणि हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. पण, सध्या पावसाळी पिकनिकमध्ये लोक बेधुंद होऊन कोणतेही भान न जपता पर्यटक गैरव्यवहार करतो. पर्यटक मोठमोठ्या आवाजात लाऊड स्पिकर लावून ध्वनी प्रदूषण करतात. काही लोक तर पर्यंटनास्थळी मद्यपार्ट्या करतात. पार्ट्या संपल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास फेकून देतात. त्यामुळे निसर्गाची हानी होतेच; शिवाय पर्यटनस्थळाचं सौंदर्य विद्रूप होते.

बेळगाव परिसरातील वर्षा पर्यटनाची ठिकाणे

चंदगड मार्गे आंबोली, बाबा फॉल्स, पारगड, कलानंदीगड, तिलारी, जांबोटी, चोर्लामार्गे आणि खानापूर, भिमगड, गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅम, राकसकोप डॅम, कणकुंबी, हलशी, हंडी ‌भडंगनाथ, दांडेली नागरगाळी, तिलारी.

काय खबरदारी घ्यावी?

  • घरातून निघण्यापूर्वी वाहनांची आवश्यक ती तपासणी कणे गरजेचे

  • ‘वाहन व्यवस्‍थित तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू नये

  • पर्यटनस्थळ, धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरात बेभानपणे वर्तन नको

  • प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी

  • कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी

  • अतिउत्साहीपणा टाळायला हवा.

  • मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत धोक्याचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com