esakal | पावसाळ्यात Ferry Ride चा आनंद घ्यायचाय? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

ferry ride

पावसाळ्यात Ferry Ride चा आनंद घ्यायचाय? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पावसाळ्यात लोक शनिवार आणि रविवारची सुट्टी साजरे चांगले स्थळ शोधतात. या काळात लोक ट्रेकिंग, बोटिंग, सायकलिंग इत्यादी गोष्टींचा आनंद घेतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात फेरी राईडची (Ferry Ride) एक वेगळीच मजा आहे. फेरी राइडसाठी लोक मोठ्या संख्येने देशभर प्रवास करतात. आपल्यालासुद्धा पावसाळ्याच्या दिवसात फेरी राइडचा आनंद घ्यायचा असेल तर अशा ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (best places for ferry rides in monsoon season)

हेही वाचा: भारतातील ही आहे बेस्ट वाॅटर पार्क; जीथे आहे फक्त मनोरंजन,आनंद

कोची, केरळ -

केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. केरळमध्ये हनीमूनसह वीकेंड सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तसेच आपण केरळमध्ये फेरी राइडचा आनंद घेऊ शकता. कोची, केरळ येथे फेरी राईडची सुविधा उपलब्ध आहे.

वेम्बनाड तलाव -

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यापासून वेम्बनाड तलाव फक्त 15 किमी अंतरावर आहे. हा तलाव अनेक नद्यांना जोडलेला आहे. वेम्बनाडमध्ये हाऊस बोट तसेच फेरी राइडची सुविधा उपलब्ध आहे. आपण या तलावामध्ये मासेमारी देखील करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात वेम्बनाड तलावाला भेट दिलीच पाहिजे.

मुंबई -

मुंबई शहर आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. या शहरात अनेक ठिकाणी तुम्ही भटकू शकता. मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. फेरीच्या राईडचा खरा आनंद घेण्यासाठी आपण गेट वे ऑफ इंडियाला भेट देऊ शकता. गेट वे ऑफ इंडिया येथे फेरी राइडची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. आपण फेरी राइडद्वारे एलिफंटा बेटाला देखील भेट देऊ शकता.

चिल्का तलाव -

चिलका तलाव भारताच्या ओडिशा राज्यात आहे. या तलावामध्ये फेरी राइडची सुविधा उपलब्ध आहे. पावसाळ्यात या तलावाचे पाणी गोड होते. त्याचबरोबर इतर ऋतूंमध्ये सरोवराचे पाणी खारट राहते. यासोबतच चिल्का सरोवरात अनेक प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात.

loading image
go to top