Travel Story : आयुष्यात एकदातरी अनुभवावी अशी विकेंड ट्रीप, भारतातील बेस्ट रोड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel Story

Travel Story : आयुष्यात एकदातरी अनुभवावी अशी विकेंड ट्रीप, भारतातील बेस्ट रोड!

शाळेत असताना अनेकदा आपल्या आवडी निवडी काय असं विचारल्यास अनेकांचे कॉमन उत्तर वाचन, लेखन, नृत्य किंवा गायन असेच असेल. त्यातही एखाद्याने जर का फिरालया आवडतं असं म्हटलं तर जरा वेगळंही वाटत असेल. काहीजण तर शाळकरी वयात हा किती फिरत असेल असेही म्हणतात. पण खरंच फिरणे ही अनेक तरूणांची आवड असते.

हायवेला असताना अनेकदा तुम्ही हवेशी गप्पा मारत जाणाऱ्या बाईक्स पाहिल्या असतील. रोड ट्रिप एक वेगळा आणि साहसी अनुभव देते. भारतात असे अनेक मार्ग आहेत. या रस्त्यावरील प्रवास रोमांचक आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आणि मजेदार आहे. तुम्ही सर्वोत्तम रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.चला तर जाणून घेऊया रोड ट्रिपसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांबद्दल.

चेन्नई-मुन्नार

दक्षिण भारताचे निसर्ग सौंदर्य अफाट आहे. तूम्हाला रोड ट्रिप करत असताना निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर चेन्नई पासून मुन्नार पर्यंतचा रोड अप्रतिम आहे. हा रस्ता 12 तासाचा असून चहाच्या मळ्यातून जातो. त्यामुळे चहाचे मळे अनुभवता येतील. तसेच तिथे फोटोशूटही करू शकता.

बंगळूर - बंदिपूर

कर्नाटक राज्यातील बेंगलोर हायटेक सिटी म्हणून ओळखली जाते.या शहरातील निसर्गही अद्भूत आहे. बेंगलोर शहरात रहात असात तर 4 ते 5 तासाच्या प्रवासासाठी बंदिपूर रस्ता योग्य आहे. नशाबाने साथ दिली तर या रस्त्यावर तूम्हाला हरीण, हत्ती असे जंगली प्राणीही पहायला मिळतील.

पुरी - कोणार्क

ओडीसामधील पुरी ते कोणार्क प्रवास करण्यासाठी तुम्हाला वीकेंडपर्यंत थांबावे लागणार नाही. जर तुम्ही भुवनेश्वरमध्ये असाल तर तुम्ही फक्त 6-7 तासात कोणार्कमध्ये पोहोचाल. उंच नारळाची झाडे, गावातील छोटी घरे, हिरवीगार शेती हे पाहत शेवटी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येईल.

गंगटोक- नथुलापास

सिक्कीममधील गंगटोक येथून नथुलापास रोट ट्रिप करणे म्हणजे स्वर्गाची अनुभूती मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच पर्वतरांगा आणि दाट धूके यांतून प्रवास करणे म्हणजे स्वर्गच.

पुणे-मुंबई

मुंबई पूणे एक्स्प्रेस वेने प्रवास करणे म्हणजे पाऊस आणि गारवा अनुभव घेता येतो. पावसाळ्यात हा सुखद अनुभव असला तरी या ठिकाणी दरड कोसळणे, ट्रॅफिक जॅम होणे या समस्या उद्भवतात.

टॅग्स :IndiaTravelWeekendtrip