Bibi Ka Maqbara: ‘दख्खनचा ताज’ अशी जगविख्यात ख्याती असलेल्या शहरातील ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरवात झाली. यामध्ये मकबऱ्याची भिंत आणि त्यावर असलेल्या ३७ छोट्या मिनारांच्या (मिनारेट) सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. .जगप्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती असलेल्या बीबी का मकबऱ्याचीही ख्याती तोडीस तोड अशीच. या वास्तूची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखे. औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम (राबिया-उद-दुर्राणी) यांची कबर येथे आहे. सन १६५१ ते १६६१ या काळात औरंगजेबाचा मुलगा आजमशाहकडून आईच्या स्मरणार्थ ही देखणी वास्तू बांधली गेली. या इमारतीच्या प्रमुख इमारतीमध्ये राबिया-उद-दुर्राणी यांची कबर आहे. या इमारतीच्या बाह्य भागावर फुलझाडे चितारली आहेत. मुख्य इमारतीच्या आतून रंगीबेरंगी चित्रे असून, हे मुघल वास्तुशैलीचे उत्तम उदाहरण आहे. बीबी यांच्या कबरीच्या बाजूला असलेल्या चारही कोपऱ्याला आकर्षक मिनार असून, याला जाळी आहे..केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे बीबी का मकबरा संवर्धनाचे काम सुरू आहे. याला भिंतींसह त्यावर असलेल्या छोटे मिनार यांच्या सौंदर्याकरणाचे काम सुरू आहे. याला ‘मिनारेट वर्क’ म्हणतात. मकबऱ्याच्या या भागातील फ्रेमवर्क तयार करताना पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आला..कुठेही सिमेंटचा वापर नाहीजवळपास ८० लाखांचे बजेट असलेल्या या कामामध्ये कुठेही सिंमेंटचा वापर नाही. तर चुनखडी, कुंभारांकडून खास तयार करण्यात आलेल्या विटा, गूळ, डिंक, बाहिडा, उडदाची डाळ असे मिश्रण तयार करण्यात येते. हे मिश्रण तयार करण्यासाठी जवळपास एक महिना लागतो. मिश्रण पक्के होण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागतो. पिढीजात अनुभव असलेल्या शहरातील कलाकारांनाच संवर्धनाचे काम देण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.