

Low Budget Foreign Tour
Sakal
Cheapest Foreign Countries to Visit: अनेक लोकांचा असा समज असतो की परदेशात प्रवास करणे महाग असते आणि त्यासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असते. पण सत्य हे आहे की जग भरात असे अनेक देश आहेत जिथे प्रवास करणे अनेक प्रमुख भारतीय शहरांपेक्षा स्वस्त असू शकते. आलिशान हॉटेल्स, परवडणारे जेवण, स्थानिक वाहतूक आणि सुंदर पर्यटन स्थळे हे देश भारतीय प्रवाशांसाठी आदर्श बनवतात. जर तुम्ही या वर्षी फॉरेन ट्रिपचा विचार करत असाल तर पुढील काही देशांची सैर करु शकता.