Chandoli Sanctuary : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! चांदोली अभयारण्य आजपासून खुले; 'अशा' असणार सोयी-सुविधा

चांदोली अभयारण्य (Chandoli Sanctuary) पर्यटकांसाठी (Tourists) खुले होत आहे.
Chandoli Sanctuary
Chandoli Sanctuaryesakal
Summary

कोरोनानंतरच्या काळात पर्यटनाचा टक्का वाढला आहे. लोक फिरायला बाहेर पडत आहेत.

सांगली : चांदोली अभयारण्य (Chandoli Sanctuary) पर्यटकांसाठी (Tourists) खुले होत आहे. आजपासून (ता. १५) या हंगामाचा प्रारंभ होत आहे. वन विभागाने (Forest Department) त्याची तयारी पूर्ण केली आहे. या वर्षी पर्यटकांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील शाळांनी प्राधान्याने ‘चांदोली’त यावे, आपली वनसंपदा, प्राणिसंपदा पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनानंतरच्या काळात पर्यटनाचा टक्का वाढला आहे. लोक फिरायला बाहेर पडत आहेत. त्यात जिल्ह्यातील सर्वांत प्रभावी आणि लोकप्रिय केंद्र चांदोली जंगल, धरण आणि पाचगणीचे पठार आहे. पावसाळ्यात येथे प्रवेश बंद असतो. आता तो खुला होईल आणि हिरवागार निसर्ग पाहण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येईल. समवेतच जिल्ह्यातील एकमेव धरण, अत्यंत देखणे पाचगणी पठार, यासह पर्यटकांना बिबट्या, अस्वल, गवे, साप, असंख्य जातीचे पक्षी पाहण्याची संधी मिळू शकते.

Chandoli Sanctuary
Navratri 2023 : 'ती' उभीये सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय! सर्व बंधनं झुगारत पुरुषाच्या बरोबरीनं दाखवतेय महाराष्ट्राला आपलं सामर्थ्य

धरणावर स्वतंत्र प्रवेश

वारणा नदीवरील चांदोलीचे धरण पाहण्यासारखे आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेऊन शुल्क भरून प्रवेश दिला जातो.

जिप्सीबाबत चर्चा

स्थानिकांनी काही जिप्सी गाड्या पर्यटकांनासाठी ठेवल्या आहेत, मात्र त्या पंधरा वर्षांहून अधिक जुन्या आहेत. जंगलात १२ वर्षांहूम अधिक जुनी गाडी नेता येत नाही. गावकऱ्यांनी एक समिती बनवली आणि जुन्या वाहनांचा आरटीओ परवाना नूतनीकरण करून घेतला तर त्यांना परवानगी शक्य आहे. त्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे नंदकुमार नलवडे यांनी सांगितले.

Chandoli Sanctuary
Navratri Festival 2023 : नवरात्रोत्सव म्हणजे काय? उत्सवात 'हिरण्यगर्भ'चं काय आहे महत्त्व? जाणून घ्या..

...असा असेल पर्यटन मार्ग

  • प्राण्यांच्या पुतळ्यांनी सजलेली स्वागत कमान

  • शेवताई मंदिर

  • प्रवासात प्राणी-पक्षिदर्शन

  • खुंदलापूर... शेवटचे गाव

  • नांदोली गेट... स्वच्छतागृह व विश्रांतीकक्ष

  • १४ किलोमीटर जंगल सफारी

  • जनीचा आंबा... न्यायदान करणाऱ्या जनीची कथा

  • जागतिक वारसा यादीतील प्रजातींची पाहणी

  • वॉच टॉवर, पॅगोडा... धरण बॅक वॉटरचे दर्शन

  • लपनगृहातून पाणवठ्यावरील प्राणी, पक्ष्यांचे दर्शन

  • झोळंबी सड्यावर प्रवेश

  • पुरातन विठलाई मंदिरदर्शन व उपजत पाणी असलेल्या विहिरीची पाहणी

Chandoli Sanctuary
Navratri Festival 2023 : महालक्ष्मी प्राधानिक रहस्याची मुळदेवता, पण..; काय सांगतो देवीचा इतिहास? जाणून घ्या..

सोयी-सुविधा

  • पर्यटकांसाठी दोन बसची सोय. एक २५ क्षमता, दुसरी १७ क्षमता

  • प्रतिपर्यटक - मुलांसाठी २०० रुपये, मोठ्यांसाठी २५० रुपये शुल्क (प्रवेश, गाईड, प्रवास एकत्रित)

  • शिराळा तालुक्यातील शाळकरी मुलांना ७५ टक्के सूट, बफर झोनमधील शाळांना मोफत प्रवेश

  • पर्यटकांच्या खासगी वाहनांचा ग्राऊंड क्लिअरन्स चांगला असेल तर गाईडसमवेत नेता येते

  • हलक्या वाहनास १५०, मोठ्या वाहनास २५० रुपये शुल्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com