Chardham Yatra 2025: ग्रीन चारधाम मोहिमेला झाली सुरूवात, प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याचे मुख्यमंत्री धामी यांनी दिले आदेश
Chardham Yatra 2025:
आगामी 30 एप्रिलपासून सुरू होणा चारधाम यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. चारधाम यात्रेमध्ये भाविकांना काही कमी पडू नये यासाठी उत्तराखंड प्रशासन योग्य ती काळजी घेईल. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी ग्रीन चारधाम यात्रा मोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. तसेच, त्यांनी चारधाम यात्रे दरम्यान ‘सिंगल युज प्लास्टीक’मोहीमेचा प्रचार करण्यासही सांगितले.
आगामी चारधाम यात्रेच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी म्हणाले की, यात्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम केले पाहिजे असे सांगितले. ही यात्रा आपल्या राज्याची ओळख आहे. त्यामुळे, राज्यातील लोकांना यातून मोठा आर्थिक लाभ होईल. राज्यासाठीही ही एक संधी आहे. मागील वर्षाच्या चारधाम यात्रेतील आव्हाने लक्षात ठेवून पुढील योजनांवर काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

