
Chausasth Yogini temple : संसद भवन ज्या मंदिरावरून बनवले गेले ते चौसष्ठ योगिनी मंदिर तूम्ही पाहिले का?
भारताचे संसद भवन ज्या प्राचिन मंदिरावरून बनवले गेले आहे ते चौसष्ठ योगिनी मंदिर अद्भूत आहे. तूम्ही कधी या मंदिराचे स्ट्रक्चर पाहिले आहे का? भारतात एकूण चार चौसष्ठ योगिनी मंदिरे आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशातील मुरैना येथे असलेले चौसष्ठ योगिनी मंदिर सर्वात प्रमुख आणि प्राचीन आहे.
मुरैना येथे असलेले हे भारतातील असे प्राचिन मंदिर आहे जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे. एकेकाळी हे मंदिर तंत्र-मंत्रासाठी खूप प्रसिद्ध होते. म्हणून या मंदिराला तांत्रिक विद्यापीठ असेही म्हटले जाते. देश-विदेशातून लाखो लोक येथे तांत्रिक तंत्र-मंत्र शिकण्यासाठी येत होते. आज या मंदिराच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

हेही वाचा: Lohagad Fort: प्रसिद्ध लोहगड किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का? होळकरांनी केलेला इंग्रजांचा पराभव
चौसष्ठ योगिनीच्या या मंदिरात जाण्यासाठी 200 पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर गोलाकार असून त्यात 64 खोल्या आहेत. यातील प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. मंदिराच्या मध्यभागी एक मोकळा मंडप आहे. ज्यामध्ये एक मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर 1323 मध्ये क्षत्रिय राजांनी बांधले होते.

हेही वाचा: Jagannath Puri Temple: श्री कृष्णांचं हृदय आजही आहे इथे स्थित; मूर्तीला स्पर्श केल्यावर जाणवतो श्वासोच्छवास!
या मंदिरातील प्रत्येक खोलीत शिवलिंगासोबत योगिनी देवीची मूर्ती होती. पण त्यातील काही मूर्ती चोरीला गेल्यामुळे या मूर्ती आता दिल्लीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर असे नाव पडले.

हेही वाचा: Tourist : मुळशी, वेल्हे, मावळ, हवेली, लोणावळ्यात पर्यटकांची पसंती; फार्महाउस हाउसफुल्ल!
हे मंदिरातील 101 खांबांवर विराजमान आहे. भारतीय पुरातत्व विभागाने हे मंदिर प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे. ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी या मंदिराच्या आधारावरच दिल्लीचे संसद भवन बांधले होते. पण, याबद्दलची माहिती कुठेही सापडत नाही. मंदिर केवळ बाहेरून संसद भवनासारखेच नाही तर आतमध्ये खांबांची रचना देखील सारखीच आहे.

हेही वाचा: Himachal Tourism : ‘ये हसी वादिया, ये खुला आसमा’; जोडीदारासोबत हिमाचल टूर म्हणजे स्वर्गसुखच!
या मंदिरात अजूनही शिवाच्या तंत्र साधना सुरू आहे, अशी मान्यता आहे. त्यामुळे इथे रात्रीच्यावेळी थांबायला कोणालाही परवानगी नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे रात्रीच्यावेळी पक्षीही फिरकत नाहीत.
हेही वाचा: Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या
या सर्व ६४ योगिनी देवी आदिशक्ती कालीचे अवतार आहेत. घोर नावाच्या राक्षसाशी युद्ध करताना काली मातेने योगीनी देवीचा अवतार घेतला असल्याचे पौराणिक मान्यता आहे. चौसठ योगीनी मंदिर एकेकाळी तांत्रिक विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. एकेकाळी या मंदिरात तांत्रिक सिद्धी मिळविण्यासाठी तांत्रिकांचा मेळा भरत असे.
हेही वाचा: IRCTC Thailand Tour : अशी संधी पुन्हा येणे नाही; 50 हजारात फिरा थायलंड, बँकॉक, पटाया अन् बरंच काही!
तंत्र-मंत्राचे ज्ञान घेण्यासाठी परदेशी नागरिकही येथे येत असत. आजही काही तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी यज्ञ करतात. येथील हे मंदिर इकंटेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते.