Tourism : मनालीचा प्लॅन करताय? दिल्लीहून पोहोचण्यासाठी जाणून घ्या सर्वात स्वस्त मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism plan

मनालीत गेल्यानंतर तुम्ही बर्फाच्छादित टेकड्या, सुंदर स्थानिक बाजारपेठांचा आनंद घेऊ शकता.

Tourism : मनालीचा प्लॅन करताय? दिल्लीहून पोहोचण्यासाठी जाणून घ्या सर्वात स्वस्त मार्ग

मनाली हे ठिकाण अनेकांच्या आवडीचे आहे. हनिमूनसाठी अनेक जोडपी या ठिकाणाला भेट देतात. दिल्लीच्या जवळ असलेल्या हिल स्टेशनपैकी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून मनालीला ओळखले जाते. येथे गेल्यानंतर तुम्ही बर्फाच्छादित टेकड्या, सुंदर स्थानिक बाजारपेठांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय नदी काठावर बसून पाण्याचा आवाज ऐकू शकता. या परिसरात तुम्ही अनेक सुंदर कॅफेंचा आनंदही घेऊ शकता.

दिल्लीतील काही लोक लाँग वीकेंडला जाण्यासाठी मनाली दौऱ्यावर जाण्याचा विचार करतात. दिल्ली ते मनाली सुमारे 550 किमीचे (दिल्ली ते मनाली अंतर) आहे. दरम्यान, सर्वाधिक लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दिल्लीतून मनालीला पोहोचायचे कसे? हा प्रश्न तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील कुणालाही पडत असेल. आज आम्ही तुम्हाला दिल्लीहून मनालीला पोहोचण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग सांगणार आहोत.

हेही वाचा: Health News : खांदेदुखीकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे, का? वाचा सविस्तर बातमी

विमानाने कसे जाल?

मनालीला सर्वात जवळील विमानतळ म्हणजे भुंतर विमानतळ होय. जे मनालीपासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. भुंतरला दिल्ली आणि चंदीगडला जोडणारी देशांतर्गत उड्डाणे आहेत. एकदा तुम्ही या विमानतळावर पोहोचला की तुम्हाला प्रीपेड टॅक्सी सहज मिळतात. ज्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार बुक करू शकता. आणि आनंदाने मनाली फिरु शकता.

रेल्वेने कसे जाल?

मनाली हे शहर उंच टेकडीवर असल्याने या ठिकाणी कोणीतीही रेल्वे पोहचत नाही. दरम्यान, चंदीगड किंवा पठाणकोट रेल्वे स्टेशन मनालीपासून सर्वात जवळचे आहे. जर तुम्ही दिल्लीहून मनालीला जात असाल, तर तुम्ही चंदीगडला जाऊ शकता आणि नंतर पुढील प्रवासासाठी बस किंवा टॅक्सी निवडू शकता.

हेही वाचा: Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी 'या' घरगुती ट्रिक्स वापरा, नक्की फरक जाणवेल

रस्त्याने कसे जाल?

मनाली हे लेह, कुल्लू, शिमला, धर्मशाळा आणि नवी दिल्ली यासह काही ठिकाणी बसेसच्या नेटवर्कने चांगले जोडलेले आहे. तुम्ही दिल्लीहून कोणतीही चांगली एसी व्होल्वो बुक करू शकता. या प्रकारच्या बसचे तिकीट सुमारे 800-1200 रुपये आहे. मात्र, बसच्या तिकिटांची किंमत बदलते.

चांगला पर्याय कोणता?

दिल्लीहून मनालीला जाण्यासाठी रोड मार्ग हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तुम्हाला दिल्लीच्या प्रत्येक प्रमुख भागातून मनालीला जाणारी व्होल्वो सापडेल. हे दिल्लीहून सुरु होऊन 2 ठिकाणी थांबते (त्या सर्व बसेससाठी भिन्न आहेत). तुम्हाला मनालीकडे जाण्यासाठी या बसेसचा वापरही करु शकता. जेणेकरून तुम्हाला हवा तसा थांबत थांबत प्रवास करता येईल.

Web Title: Cheapest Way From Delhi To Manali Distance Between And How To Travel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..