Mountain City : चीननं ३० व्या मजल्यावर थाटलं शहर! | Global News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chongqing mountain city of china

चीनमधील(China) चोंगकिंगला ( Chongqing) माउंटन सिटी (Mountain City) असे नाव देण्यात आले आहे. हे शहर इतक्या उंचीवर बांधले गेले आहे की तळमजल्यावरून एक झेप घेतली तरी जीवावर बेतू शकते.

Mountain City : चीननं ३० व्या मजल्यावर थाटलं शहर!

chongqing mountain city of china : चीन(Chaina) भलेही आज कोरोनामुळे बदलना झाला आहे तरी या देशातील इंजीनियर्स नेहमीच कौतूक केले जाते. चीनने नेहमी अशा गोष्टी बनविल्या आहेत ज्या नेहमीच जगाला आश्चर्यचकित करतात. मग तो कोरोना व्हायरस असोत की आश्चर्यचकीत करणारी कारीगिरी.

चीनमध्ये एक असे शहर आहे जिथून तुम्ही खाली डोकावले तर ३० व्या मजल्यावर आहात असे वाटते पण मागे वळून पाहिले तर प्रत्यक्षात तुम्ही तळमजल्यावर असता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. अशक्य वाटणारी ही गोष्ट चीनने तयार केली आहे.

सोशल मिडियावर सध्या चीनमधील एक शहराची चर्चा होत आहे. या शहराला माऊंटन सिटी म्हटले जाते. चोंगकिंग (Chongquing) नावाचे शहर डोंगरावर वसवले आहे. इतक्या उंचीवर शहराचे फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे.

हेही वाचा: तुम्ही घरी किती सोने ठेवू शकता? एवढ्या सोन्यावर लागत नाही Tax

चोंगकिंग शहराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनमधील इतर इमारतींच्या तुलनेमध्ये हे शहर तिसाव्या मजल्यावर आहे. त्याचा तळमजला एवढ्या उंचीवर आहे की तिथून कोणी पडले तर त्याचे जिवंत राहणे अशक्य आहे.. डोंगर फोडून हे शहर वसले आहे. Instagram वर cityscape_discovery नावाच्या अकाउंटवर या शहराचा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढ्या उंचीवर असूनही या शहरात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Atal Pension Yojna: या योजनेत मिळू शकते10 हजार रुपये मासिक पेन्शन

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी चिनी आर्किटेक्ट्सचे कौतुक केले. बर्‍याच लोकांनी लिहिले की, ''हे खूपच आश्चर्यकारक आहे.'' ''चिनी कारागिरांनी बनवलेल्या गोष्टी छान आहेत,'' जसे अनेकांनी कॉमेंट्समध्ये लिहिले आहे. पण, हे शहर प्रेक्षणीय स्थळ म्हणून चांगले असले तरी राहण्यासाठी नाही, असेही अनेकांनी सांगितले आहे. दुसरीकडे एका व्यक्तीने कमेंट केली की, ''या शहरात एकही झाड दिसत नाही.''

या शहराचा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. एकूण लोकसंख्या सुमारे 35 दशलक्ष आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Web Title: Chongqing Mountain City Of China

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top