Marine Drive: चुकून बांधण्यात आलेल्या मरीन ड्राईव्हचा हा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का?

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हसह नरीमन पॉईंटपर्यंत लाखो चाहत्यांचा जनसागर उसळला होता.
Do you know the story of Marine Drive built by mistake
Do you know the story of Marine Drive built by mistake

सध्या मुंबईचा मरीन ड्राईव्ह चांगलाच चर्चेत आला आहे. अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मायदेशी परतला. संघाचे मायदेशी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हसह नरीमन पॉईंटपर्यंत लाखो चाहत्यांचा जनसागर उसळला होता. त्यामुळे जगभरात काल मरीन ड्राईव्हची चर्चा अधिक रंगल्याची पाहायला मिळाली. पण तुम्हाला माहितीय का या ठिकाणाला मरीन ड्राईव्ह का म्हटले जाते? आणि त्याचा इतिहास काय?

मुंबईतील सर्वात लोकप्रिय जगांपैकी एक असणाऱ्या मरिन ड्राइव्हला 100 पेक्षा अधिक वर्षे उलटून गेले आहेत. क्वीन्स नेकलेस म्हणजेच राणीचा हार अशी उपाधी लाभलेल्या मरीन ड्राईव्हला यापूर्वी केनेडी रोड असे म्हटले जायचे. आज या रस्त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे नाव दिले आहे.

तर मरिन ड्राइव्ह चुकून बांधण्यात आला

मरिन ड्राइव्ह हा चुकून बांधण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1920 मध्ये ब्रिटीश सरकारने मुंबई शहर आणि अरबी समुद्रामध्ये एक भिंत बांधली होती. तेव्हा ही एक मोठी चुक मानन्यात आली. यावेळी नरिमन पॉईंट ते मलाबार हिल्सला जोडण्यासाठी अरबी समुद्रात एक भिंत बांधण्यात आली. पण ही भिंत अशी बांधण्यात आली की ती वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरली. त्यावेळी ब्रिटश सरकारने निर्णय या मार्गाचे रस्त्याचे रुपांतर करायचे. मरीन ड्राईव्हला मुंबईचे लोक सोलापूर असेही म्हणतात. अशाप्रकारे हा मरिन ड्राईव्ह बनला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com