Cruise Travel : पहिल्यांदाच क्रूझ सफारीवर निघालात? मग, 'या' गोष्टी लक्षात ठेवा प्रवास होईल अविस्मरणीय

Cruise Travel : प्रवास केल्याने आपल्याला रोजच्या दैनंदिन कामातून जरा ब्रेक मिळतो. नवा परिसर, तिथली खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळे पहायला मिळतात.
Cruise Travel
Cruise Travelesakal

Cruise Travel : लहान मुले असुदे किंवा मोठी माणसे जवळपास सर्वांनाच फिरायला जायला आवडते. प्रवास केल्याने आपल्याला रोजच्या दैनंदिन कामातून जरा ब्रेक मिळतो. नवा परिसर, तिथली खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळे पहायला मिळतात. या सगळ्यातून आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. शिवाय, आपला मूड फ्रेश राहतो. त्यामुळे, फिरायला वेळ नक्कीच काढत जा.

अनकेदा आपण रेल्वेने, विमानाने किंवा गाडीने प्रवासाला जातो. मात्र, तुम्ही कधी क्रुझमध्ये प्रवास केला आहे का? क्रुझने प्रवास करण्याची मजा काही औरच आहे. मागील काही वर्षांपासून क्रुझ सफारी अनेक भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय लोकांना हा क्रुझमधील प्रवास साहसी आणि रोमांचक वाटतो.

जर तुम्ही देखील पहिल्यांदाच क्रुझ सफारीवर जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच क्रुझ सफारीवर जाताना काही महत्वाच्या आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत.

Cruise Travel
Travel Diaries : मार्चमध्ये लाँग ट्रीपवर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'या' भन्नाट ठिकाणांना नक्की द्या भेट

क्रुझ ट्रीपचे डिटेल्स तपासा

क्रुझ ट्रीपचे पॅकेज बुक करताना तुम्ही सर्व गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. अनेकदा फोनवरूनच आपण या सर्व गोष्टी बोलतो. मात्र, काही वेळा छोट्या-मोठ्या गोष्टी चुकतात आणि नंतर समस्या उद्भवू शकतात. जसे की, नाश्ता आणि जेवणासाठी वेगळे पैसे असणे.

क्रुझमध्ये इतर साहसी गोष्टी करण्यासाठी वेगळी फी असणे, अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे, या सगळ्या गोष्टींची आधी नीट चौकशी करून घ्या. त्यासोबतच तुमच्या क्रुझच्या रूटची देखील चौकशी करा.

हवामानाची माहिती घेणे महत्वाचे

जेव्हा कधी आपण कुठेतरी ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करतो, तेव्हा त्या परिसरात वातावरण कसे असणार आहे? किंवा पावसाची शक्यता तर नाही ना? या गोष्टींची आधी माहिती घेतो. त्याचप्रमाणे क्रुझवर जाताना ही हवामान कसे असणार आहे? याची माहिती घेणे महत्वाचे आहे.

क्रुझ सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला हवामानाची जाणीव असणे गरजेचे आहे. खास करून देशाबाहेर तुम्ही जात असाल तर तुम्हाला आगामी हवामानाची माहिती असायला हवी. जर हवामान अनुकूल नसेल तर तुम्ही सहलीला जाणे टाळायला हवे. कारण, मुसळधार पावसामुळे अनेक क्रुझ जहाजे समुद्रात अडकून पडतात.

Cruise Travel
Andaman Travel : अंदमानला फिरायला जायचय? मग, तिथे गेल्यावर 'या' गोष्टी करायला विसरू नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com