Bengaluru-Rishikesh Direct Train: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी; बंगळुरु-ऋषिकेश थेट ट्रेन आता नागपूर मार्गे

Bengaluru to Rishikesh Gets its First Direct Train: बंगळुरु–ऋषिकेश थेट ट्रेन आता नागपूर मार्गे धावणार असून धार्मिक आणि पर्यटन प्रवासासाठी नवी सोय उपलब्ध झाली आहे.
Bangalore Rishikesh train via Nagpur
Bangalore Rishikesh train via Nagpursakal
Updated on

How to book tickets for Bengaluru-Rishikesh special train: भारतीय रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेत 19 जून 2025 पासून बंगळुरुहून थेट ऋषिकेशपर्यंतची ट्रेन सेवा सुरू केली असून ही ट्रेन महाराष्ट्रातूनही जाणार आहे. ही बंगळुरु-ऋषिकेश ट्रेन नागपूरला स्टॉप घेणार आहे. नागपूरकरांना उत्तरेकडील धार्मिक पर्यटनस्थळांपर्यंत सहज प्रवास करता येणार आहे.

ही सेवा "यशवंतपूर–ऋषिकेश एक्स्प्रेस स्पेशल" या नावाने ओळखली जाणार असून, ट्रेन क्रमांक 06597/06598 असे असतील. या ट्रेनमुळे विशेषतः चारधाम यात्रा, हरिद्वार आणि ऋषिकेशकडे जाणाऱ्या भाविक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेनचं वेळापत्रक

  • बंगळुरुहून (यशवंतपूर) सुटणार : 19 जून, 26 जून, 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता

  • ऋषिकेश : दुसऱ्या दिवशी सकाळी 10.20 वाजता

  • ऋषिकेशहून परतीचा प्रवास : 21 जून, 28 जून, 5 जुलै रोजी संध्याकाळी 5.55 वाजता

  • बंगळुरु : दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.45 वाजता

नागपूरसह महत्त्वाचे स्टॉप

या दीर्घ रेल्वेमार्गात नागपूरसह खालील ठिकाणांवर स्टॉप असणार आहेत:

येलहंका, हिंदूपूर, धर्मावारम, कर्नूल, हैदराबाद (काचिगुडा), बल्हारशाह, नागपूर, भोपाळ, झांसी, आग्रा कँट., दिल्ली (हजरत निजामुद्दीन), मेरठ, हरिद्वार व ऋषिकेश

प्रवाशांसाठी सुविधा

या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये विविध श्रेणींतील प्रवासाचा पर्याय दिला आहे:

  • एसी फर्स्ट क्लास

  • एसी 2 टियर

  • एसी 3 टियर

  • स्लीपर क्लास

  • सामान्य (जनरल) डबे

प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये ऑनबोर्ड केटरिंग तसेच ई-केटरिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ट्रेन कमाल 130 किमी/तास वेगाने धावणार असून सरासरी वेग 47 किमी/तास असेल.

तिकिट बुकिंग कसे कराल?

  • अधिकृत IRCTC वेबसाइटवरून

  • देशभरातील रेल्वे आरक्षण केंद्रांवरून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com