
Guidelines For First-Time Visitors of Mahakumbh Mela 2025: महाकुंभ मेळा दार १२ वर्षांनी भरतो. यावर्षी हा मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान भरणार आहे. तुम्हालाही महाकुंभ मेळ्याला जायचे असेल तर एकदा खाली दिलेली माहिती नक्की वाचा.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज सध्या देशभरात आकर्षणाचे केंद्र बनले आहे, कारण पुढील महिन्यात येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन होणार आहे. दर 12 वर्षांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केलेले असते, आणि यंदाचा महाकुंभ 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाविक या ठिकाणी येणार आहेत.